9 ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे आणि या विमानाची बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या वेबसाईटला सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सिंधुदुर्ग एअरपोर्टचे स्टेशन व्यवस्थापक कुलकर्णी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होणार आहे या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. यासंदर्भात विमानतळाचे स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की, ९ ऑक्टोबर पासून सुरु होणारे हे विमान दररोज असणार आहे. हे विमान दररोज दुपारी ११. ३५ वाजता मुंबईहून सुटून ते १ वाजेपर्यंत सिंधुदुर्गात येणार आहे. सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी १ तास २५ वाजता सुटून २.५० वाजेपर्यंत मुंबईत जाणार आहे. मुंबई विमानतळावरून दिल्ली, बेंगलोर, कोलकत्ता, हैदराबाद आणि चेन्नई सारख्या महानगरात जाण्यासाठी दुपारी 3.00 नंतरही विमानसेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे सिंधुदूर्गमधून विमानाद्वारे अन्य महानगरांमध्ये जाण्यासाठीही या विमान सेवेचा फायदा होऊ शकतो.
सिंधुदुर्ग एअरपोर्ट वर उतरल्यानंतर उत्तर गोव्यात जाणार्या प्रवाशांसाठी हे विमानतळ चांगला पर्याय आहे. चिपी वरून तेरेखोल, अरंबोल आणि मांद्रेम समुद्रकिनारा-यांसाठी ड्रायव्हिंग अंतर अंदाजे ६० किमी आहे. हे अंतर गोव्याच्या दाबोळी विमानतळाच्या समान आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन पाहून प्रवासी गोव्याला जाऊ शकतो. हे विमान ७० असून केंद्राच्या उडान योजनेत अंतर्भूत आहे.
१ तास २५ मिनिटात मुंबई
यावेळी स्टेशन व्यवस्थापक समिर कुलकर्णी यांनी सांगितले की सिंधुदुर्ग ते मुंबई रस्त्याने प्रवास केल्यास सुमारे ९ तास ते २० मिनिटे लागतात पण हाच प्रवास हवाईमार्गे विमानाने केल्यास प्रवाशांसाठी फक्त १ तास २५ मिनिटांचा हा प्रवास असणार आहे त्यामुळे प्रवाशांचा इतर वेळ वाचणार आहे.
ऑनलाईन बुकिंग सुरु
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ऑक्टोंबरला पहिले प्रवासी विमान उतरणार आहे आणि या विमान नाचे ऑनलाईन बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबर पासून एअर इंडियाच्या https://www.airindia.in/ या वेबसाईटला सुरू झाले आहे यासाठी प्रवाशांनी SDW हा बुकिंग कोड नोंद करावा अशी माहिती त्यांनी दिली.
The airport of Sindhudurg district is now start. All the procedures of this airport have been completed. The airport will be renamed as Sindhudurg Airport and the first flight will take off on October 9 with passengers on board. In this regard, the Samir Kulkarni, Manager of the airport said that, This flight will be daily from October 9. The plane departs daily at 11.35 A.M. from Mumbai and reach Sindhudurg till 1.00 P.M. It will leave Sindhudurg for Mumbai at 1:25 P.M. and reach Mumbai at 2.50 P.M. Flights for Metro Cities like Delhi, Bangalore, Kolkata, Hyderabad and Chennai are also available after 3.00 pm. from Mumbai Airport