गुहागर, ता. 05 : कोकणातील अनेक वर्षांपासूनची परंपरेने चालत आलेले तुळशी विवाह सोहळा मुंबईत सांताक्रूझ येथील चालीतील रहिवासी श्री समर्थ सेवा मंडळ यांचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. या मंडळाला ५१ वर्ष अविरतपणे सुरू आहे. Silver Jubilee Year of Samarth Seva Mandal

या मंडळाचे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. गुढीपाडवा, मराठी नवं वर्ष गुढी उभारून, सत्य नारायणाची महापुजा, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळी पाडवा तसेच तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्हातील लांजा जावडे कातळवाडी येथील श्री राजाराम केशव सोडये यांनी या उत्सवांना सुरुवात केली. यावर्षी 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. Silver Jubilee Year of Samarth Seva Mandal

हा तुळशी विवाह सोहळा अगदी पारंपरिक पद्धतीनं मंडप घालून, छोट्या मुलाला नवरा मुलगा तयार करून प्रथम विठ्ठल मंदिरात नंतर शिव मंदिरात दर्शन घेतले जाते. वरात ढोल ताशांच्या गजरात आणली जाते. उपस्थितांना अक्षता वाटल्या जातात. मंगलाष्टका म्हणत तुळशी विवाह केला जातो. त्यानंतर आलेल्या मंडळींना जेवनाचा बेत केला जातो. अशा प्रकारे हा तुळशी विवाह सोहऴा साजरा केला जातो. Silver Jubilee Year of Samarth Seva Mandal

