भारतामध्ये 1404 क्रमांकाने उत्तीर्ण, उत्तम महाविद्यालयातील प्रवेश झाला सोपा
गुहागर : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व कुणबी कर्मचारी संघटना गुहागरचे सदस्य जनार्दन एकनाथ भागडे व गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे यांची कन्या कु. श्रुतिका जनार्दन भागडे हिची निवड नुकतीच “एम्. फार्म” साठी झाली आहे.
श्रुतिका ही पूर्वीपासून अभ्यासात हुशार असून ती श्रीदेव गोपाळ कु्ष्ण विद्यामंदिर गुहागरची माजी विद्यार्थीनी आहे. इयत्ता १० वी मध्ये असताना ९३.०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. तर १२ वी सायन्स डिबीजे काँलेज चिपळुण येथून पूर्ण केले आहे. पुढील बी. फार्मसीचे शिक्षण सातारा देगांव येथे पूर्ण करताना तीने सेमिस्टरमध्ये “डिस्टिशन” मिळवले आहे. बी. फार्मसीचे शिक्षण घेतानाच मार्स्टस पदवी मिळविण्यचे ध्येय ठेवून तीने अभ्यास केला.
देश पातळीवर एम्. फार्मसीसाठी घेतल्या गेलेल्या “GPAT” या कठीण प्रवेश परीक्षेत तीने भारतात 1404 रँक मिळवली आहे. या परीक्षेसाठी देशातून एकूण ४५,५०७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४,४४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (In GPAT Exam Shrutika achieve 1404 Rank in India. Across the country 4,447 Out of 45,507 students have passed GPAT)
गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या काळातही अभ्यासात सातत्य ठेवून ती परीक्षेची तयारी करत होती. कोरोनाच्या काळात गुहागरला असताना ऑनलाईन अभ्यासात सतत अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेकवेळा साताऱ्यात मैत्रिणींकडे राहून अभ्यास केला. तिला 1404 ही रँक मिळाल्याने उत्तम दर्जाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे सोपे झाले आहे.