मत्स्य महाविद्यालयातर्फे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
रत्नागिरी – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्ड पुरस्कृत “निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन” या विषयावर तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Department of Fisheries Dapoli, under Fisheries College, Shirgaon, Ratnagiri will be hosting a three-days non-residential training program on “Shrimp Water Conservation” sponsored by National Fisheries Development Board from 28th September to 30th September 2021.
The training program provides detailed information on Shrimp Conservation: Current Status, Future Trails, Conservation Pond Design and Construction, Shrimp Seed Production Technology, Shrimp Seed Pre-Storage Pond Management, Shrimp Food Management, Organic Biology, Organisms, Minerals, Shrimp Health Management, Government Cooperation. Demonstration will be given in class.
कार्यक्रम राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्डाच्या नियम आणि अटी नुसार प्रत्यक्ष उपस्थितीसह कोव्हीड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण नि:शुल्क असून प्रशिक्षणार्थींची निवड हि महाराष्ट्रातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभधारक आणि संभाव्य कोळंबी संवर्धकातून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्रमाणे करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींची संख्या ५० पर्यंत सिमित आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमातील सैंधातिक आणि प्रात्यक्षिक वर्गास उपस्थिती आवश्यक असून त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमात कोळंबी संवर्धन: सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल, संवर्धन तलाव आराखडा व बांधकाम, कोळंबी बीज निर्मिती तंत्रज्ञान, कोळंबी बीज साठवणूकपूर्व तलाव व्यवस्थापन, कोळंबी खाद्य व्यवस्थापन, आद्य जैवके, प्रजैवके, खनिजे, कोळंबी आरोग्य व्यवस्थापन, शासनाचे सहकार्य याविषयी विस्तृत माहिती सैधांतिक आणि प्रात्यक्षिक वर्गात देण्यात येईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमात नाव नोंदणीसाठी डॉ. अनिल पावसे ९४२२४३०४९८ व डॉ. सुरेश नाईक ८२७५४५४८२१ मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा.