• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गोपाळगडावर शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात

by Ganesh Dhanawade
February 20, 2026
in Guhagar
80 1
1
Shiva Janmotsav celebration at Gopalgad
158
SHARES
451
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : छ. शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी…, संभाजी महाराज की जय…च्या घोषणांनी गुहागर व अंजनवेल परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व अंजनवेल येथील तमाम शिवप्रेमी यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने गुहागर छ. शिवाजी महाराज चौक ते किल्ले गोपाळगड अशी भव्य शिव पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी किल्ले गोपाळगडावर असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत भगवे ध्वज फडकविण्यात आले. Shiva Janmotsav celebration at Gopalgad

सकाळी शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि श्रीफळ वाढवून मिरवणूकीला प्रारंभ झाला. त्या आधी शिव पादुकांचे पूजन केले. गुहागर येथून निघालेली शिव मिरवणूक गुहागर बाजारपेठ मार्गे वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन झाले. याठिकाणी ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन व जगदंबेची भेट झाली. Shiva Janmotsav celebration at Gopalgad

अंजनवेल गोपाळगड येथे स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावरील गीतावर नृत्य व पोवाडे सादर केले. यावेळी पादुका पूजन व ध्वजारोहन करून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. Shiva Janmotsav celebration at Gopalgad

या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, सेक्रेटरी निलेश गोयथळे, संचालक संतोष वरंडे, राजेंद्र आरेकर, सुधाकर कांबळे,  सिद्धीविनायक जाधव, बाबासाहेब राशिनकर, सोहम सातार्डेकर, शामकांत खातू, प्रताप शिर्के, वैभव घुमे, शीतल साळवी, आत्माराम मोरे, अंजनवेल सरपंच सोनल मोरे, नंदकुमार खेतले, विवेक खेतले, उदेश सावंत, समीर धामणस्कर आदींसह अनेकांनी मेहनत घेतली. Shiva Janmotsav celebration at Gopalgad

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShiva Janmotsav celebration at Gopalgadटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet40
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.