• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिवसेना ठाकरे गटाच्या शृंगारतळी जि.प. गट विभाग प्रमुखपदी अतुलशेठ लांजेकर

by Mayuresh Patnakar
August 12, 2026
in Guhagar
47 1
0
Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar
93
SHARES
266
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील झोंबडी गावचे सरपंच आणि गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अतुलशेठ लांजेकर यांची शृंगारतळी जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुखपदी आमदार भास्करशेठ जाधव यांनी चिपळूण येथील पक्ष कार्यालयात नियुक्ती जाहीर केली. Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar

अतिशय नम्र आणि लोकांची कामे करणारे कार्यकर्ते म्हणून अतुलशेठ लांजेकर यांची ख्याती आहे. त्यांचा जनसपंर्क दांडका असून संघटना वाढीसाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन ते विकास कामे करतात. अतुलशेठ लांजेकर यांच्या नियुक्तीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात आणि शृंगारतळी जिल्हा परिषद गटात जल्लोष साजरा करण्यात येत असून अतुलशेठ लांजेकर यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.  Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar

आमदार भास्करशेठ जाधव यांनी अतुलशेठ लांजेकर यांना नियुक्ती पत्र देऊन हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणे आणि पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे काम आपल्या हातून घडो अशा शुभेच्छाही आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिल्या. Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar

यावेळी जिल्हा प्रमुख विक्रांतदादा जाधव, तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत, जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळ्ये, खेड तालुका प्रमुख अंकुश काते, सरपंच शैलेश साळवी, समीक्षा बारगुडे, मंगेश सोलकर, जयदेव मोरे, साक्षी चव्हाण मधुकर सावंत, स्वप्निल बारगुडे, चिपळूण तालुका प्रमुख सुभाष जाधव, चिपळूण पंचायत समिती गट नेते गौरव पाटेकर, फैसल कासकर, फैय्याज शिरळकर, नंदू चव्हाण यांचेसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. Shiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarShiv Sena Thackeray faction chief Atulsheth Lanjekarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.