• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात

by Ganesh Dhanawade
July 18, 2021
in Old News
16 0
0
गुहागर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसंपर्क अभियानाची सुरुवात १२ जुलै पासून राज्यभर करण्यात आली. आज रविवार दि. 18 रोजी गुहागर तालुक्यातील पडवे जि. प. गटामध्ये गुहागरचे लोकप्रिय आमदार भास्कर जाधव, रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरवात करण्यात आली.
गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातील  तवसाळ पंचायत समिती गण व खोडदे गणामध्ये शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ तालूकाप्रमुख सचिन बाईत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शिवसंपर्क अभियाना मार्फत लोकांशी संपर्क करुन शिवसेनेचे काम व धोरण जनतेपर्यंत पोचविण्यात येणार आहे. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक यासाठी शिवसैनिक काम करणार आहेत.
शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, पं. स. सदस्य रविंद्र आंबेकर , जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, विभागप्रमुख नरेश निमुणकर, विलास  गुरव, शरद साळवी, उकार्डे, काशिनाथ मोहिते, बाबा वैद्य , उपविभाग प्रमुख रवींद्र गावडे, संदीप  निमुणकर, महिला आघाडीच्या वनिता  डिंगणकर, सौ. रायकर, सर्व शाखा प्रमुख, यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsGuhagar TalukaLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiShiv Sampark Abhiyanटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.