संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 28 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शरदचंद्रजी पवार कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय खरवते – दहिवली येथे सामाजिक न्याय व समता दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. Sharadchandraji Pawar Agricultural College Shahu Maharaj Jayanti


यावेळी प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, विभाग प्रमुख डॉ. हरिश्चंद्र भागडे, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक आणि रा. से. यो.स्वयंसेवक विद्यार्थी यांचे उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर व सामाजिक कार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. Sharadchandraji Pawar Agricultural College Shahu Maharaj Jayanti

