• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात आपत्तीच्या मालिका

by Mayuresh Patnakar
June 23, 2026
in Guhagar
68 0
0
Series of disasters in Guhagar taluka
133
SHARES
379
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

झाडे कोसळून घरांचे नुकसान व वाहतूक बंद

गुहागर, ता. 23 : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी पडझड व नुकसानाच्या घटना घडत असून आपत्तींची मालिका सुरूच आहे. सोमवारी (दि. 23) दिवसभरात सर्वाधिक घटना नोंदविण्यात आल्या. . रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट तर उद्या (बुधवारी) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. Series of disasters in Guhagar taluka

मौजे पाचेरीसडा येथील पानबुडी फाटा–मधलीवाडी मार्गावर वादळी वाऱ्यामुळे काजूच्या झाडाची फांदी कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. ग्रामपंचायत वेलदूर अंतर्गत नवानगर येथे प्रमोद वणकर यांचे शौचालय व घराची भिंत कोसळून नुकसान झाले. तसेच छाया दाभोळकर यांच्या घरासमोरील संरक्षण भिंतही पावसामुळे कोसळली. नरवण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रोहिले महसूल गावात प्रसाद पिलणकर यांच्या घरावर माडाचे झाड पडले, तर चंद्रकांत यशवंत पिलणकर यांच्या घरावर नारळाचे झाड कोसळून अंशतः नुकसान झाले. या सर्व घटनांचे पंचनामे लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. Series of disasters in Guhagar taluka

दरम्यान, चिखली कदमवाडी येथील अशोक पुंडलिक गोयथळे यांच्या घराजवळील सुपारीचे झाड पडून घरावरील सिमेंट पत्र्यांचे नुकसान झाले. यापूर्वी दि. 22 जून रोजी जांभारी येथील जितेंद्र आग्रे यांच्या विहिरीचेही अंशतः नुकसान झाले होते. तालुक्यातील एकूण आपत्तीजन्य परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Series of disasters in Guhagar taluka

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSeries of disasters in Guhagar talukaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share53SendTweet33
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.