• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शिष्यवृती परिक्षेत तालुक्यातील 18 विद्यार्थी यशस्वी

by Mayuresh Patnakar
July 4, 2026
in Guhagar
207 2
0
Scholarship exam results
406
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी) 2026 चा निकाल 2 जुलैला जाहीर झाला. गुहागर तालुक्यातील 13 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. यापैकी 4 विद्यार्थी माध्यमिक विद्यामंदिर गुहागरचे आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) 2026 मध्ये गुहागर तालुक्यातील 5 विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. Scholarship exam results

सेट कोड जे – ग्रामीण सर्वसाधारण या श्रेणीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे मधील प्रथमेश संतोष वरवाटकर 64.00 या विद्यार्थ्यांने जिल्हा गुणवत्ता यादीत 78 वा क्रमांक मिळविला आहे. तर श्री सिध्दीविनायक विद्यामंदिर, मुंढर मधील लांजेकर स्वरा संतोष 59.33 हीने जिल्हा गुणवत्ता यादीत 115 वा. क्रमांक मिळवला आहे.  Scholarship exam results

Scholarship exam results

सेट कोड के – शहरी सर्वसाधारण या श्रेणीत गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती गुणांकन यादीत स्थान मिळविले. या विद्यामंदिरमधील सोहम समिर बावधनकर 80.667 (शहरी विभाग सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 17 वा) याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. कु. गार्गी अमोल क्षिरसागर 70.66 (शहरी विभाग सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 63 वी) हीने तालुक्यात द्वितीय पटकावला. याच शाळेतील वरद केदार भागवत 68.66 (शहरी विभाग सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 74 वा ) तालुक्यात तृतीय आला असून कु. वेदिका राजाहरीश्चंद्र जगदाळे 67.33 (शहरी विभाग सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 86 वी) ही विद्यार्थीनी तालुक्यात चौथी आली आहे. Scholarship exam results

सेट कोड ए – ग्रामीण सर्वसाधारण या श्रेणीत जि.प. प्राथमिक शाळा पडवे मधील जोह्या तबरेज मिरकर (उर्दु) 56.00, रखमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेत मधील गार्गी चंद्रकांत झिंबर 53.33, वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे मधील श्रेया संजय पालकर 52.66, रखमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेत मधील अस्मि जितेंद्र पवार 48.00, लिटल चॅम्प्स्‌ इंग्लिश मिडियम स्कूल जानवळे मधील स्नेहल विवेक पवार 47.65, न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे (इंग्लिश मिडियम सेक्शन) मधील आयुष संजय वेद्रे 47.65 यांनी यश मिळविले आहेत. Scholarship exam results

सेट कोड बी – ग्रामीण शेड्युल्ड कास्टया श्रेणीत नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली मधील तनया प्रविण मोहिते 46.00 या विद्यार्थीनीने यश मिळविले आहे.  Scholarship exam results

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) 2026 चा निकाल 2 जुलै रोजी जाहीर झाला. या मध्ये गुहागर तालुक्यातील 5 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली आहे. ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती गटात (सेट जे रुरल जनरल) जि.प. पूर्व प्राथमिक शाळा खोडदे निवातेवाडी शाळेतील सार्थक संतोष डिंगणकर 72.66 या विद्यार्थ्याने (जिल्हा गुणवत्ता यादीत 84 वा क्रमांक) तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सडेजांभारी नं. 1 मधील माही धनंजय सुर्वे 67.33 या विद्यार्थ्याने (जिल्हा गुणवत्ता यादीत 152 वा क्रमांक) तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.  Scholarship exam results

सेट कोड – के शहरी सर्वसाधारण या गटात जि.प. प्राथमिक शाळा गुहागर नं. 1 मधील अनय मंदार कानडे 84.66 याने जिल्हा गुणवत्ता यादीत 10 वा क्रमांक पटकावला आहे. तर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर मधील अन्वित विक्रांत डिगे 72.66 (शहरी विभाग – सर्वसाधारण यादीत जिह्यात 56 वा) याने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहेत. तर जि.प. प्राथमिक शाळा गुहागर नं. 1 मधील ज्ञानदा निलेशकुमार ढेरे 68.00 हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 110 वा आणि तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. Scholarship exam results

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarScholarship exam resultsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share162SendTweet102
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.