• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 June 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निकृष्ट केबल कामाविरोधात आरे-वाकी-पिंपळवट सरपंचांचे आमरण उपोषण

by Mayuresh Patnakar
June 24, 2026
in Guhagar
95 2
0
Sarpanch's hunger strike against cable work
189
SHARES
541
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : आरे-वाकी-पिंपळवट ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या अंडरग्राऊंड केबलच्या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत सरपंच समित घाणेकर यांनी आज बुधवारी गुहागर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. Sarpanch’s hunger strike against cable work

याबाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी उपविभाग गुहागर यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्त्यांची खोदाई करताना ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच रानवी ते बाजीप्रभु रोडवरील अंडरग्राऊंड केबलच्या कामात अंदाजपत्रकानुसार काम झालेले दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. Sarpanch’s hunger strike against cable work

एमएसबी कंपनी व एअरटेल कंपनीच्या केबल एकाच खोदाईत टाकून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. नियमानुसार रस्त्याच्या साईडपट्टीत केबल टाकणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी केबल गटारामधून टाकण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. Sarpanch’s hunger strike against cable work

खोदाईतील माती रस्त्याच्या कडेला टाकल्याने ती पावसामुळे डांबरी रस्त्यावर येऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने माती वाहून गेल्यामुळे केबल उघडी पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे घाणेकर यांनी म्हटले आहे. Sarpanch’s hunger strike against cable work

सदर कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशीची व्हिडीओ चित्रफीत तयार करण्यात यावी आणि चौकशीवेळी स्वतःला उपस्थित राहण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Sarpanch’s hunger strike against cable work

या निवेदनाच्या प्रती आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी चिपळूण, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, तहसीलदार गुहागर, पोलीस निरीक्षक गुहागर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर यांना देण्यात आल्या आहेत. Sarpanch’s hunger strike against cable work

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSarpanch's hunger strike against cable workटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet47
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.