नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केली अधिकृत घोषणा
गुहागर, ता. 30 : येथील नगरपंचायतीमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून संजय मालप यांची नियुक्ती पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी जाहीर केली. भाजप गुहागर शहराध्यक्ष प्रकाश रहाटे यापूर्वी स्वीकृत नगरसेवक होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रकाश रहाटे यांचा दृदैर्वी निधन झाले. त्यामुळे भाजपच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद रिक्त झाले होते. Presiding Officer and Mayor Rajesh Bendal announced the appointment of Sanjay Malap as BJP’s approved corporator in Nagar Garpanchayat. BJP Guhagar city president Prakash Rahate was sanctioned corporator. Prakash Rahate died in the second wave of Corona. As a result, the sanctioned corporator post in the BJP’s quota was vacant.
प्रकाश रहाटे यांच्या निधनामुळे भाजपमधील गुहागर शहर अध्यक्ष हे संघटनात्मक पद रिक्त झाले होते. या पदावर आठ दिवसांपूर्वी संगम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. आता स्वीकृत नगरसेवक पदी संजय मालप यांची निवड भाजपने केली. या नावाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूरी मिळाली. त्यानंतर मंगळवारी (ता. 30) गुहागर नगरपंचायतीमध्ये पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी संजय मालप यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत घोषणा केली.
दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे यांना संजय मालप आपले राजकारणातील गुरु मानतात. आजपर्यंतचा भाजपमधील यशस्वी प्रवास त्यांच्यामुळेच शक्य झाला असे संजय मालप अभिमानाने सांगतात. गुहागर शहराच्या शतप्रतिशत विकासात स्वीकृत नगरसेवक म्हणून योगदान द्यावे अशा शुभेच्छा यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे यांनी दिल्या. तर गुहागरमधील जनतेचा आवाज नगरपंचायतीपर्यंत पोचवण्यासाठी काम करावे. अशा शुभेच्छा तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी संजय मालप यांना दिल्या.
यावेळी आरोग्य सभापती प्रसाद बोले, शहर विकास आघाडीचे नगरसेवक माधव साटले, भाजपचे गटनेते उमेश भोसले यांच्यासह नगरसेवक सौ. मृणाल गोयथळे, सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, गजानन वेल्हाळ, समीर घाणेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, तालुका महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती श्रद्धा घाडे, शहराध्यक्ष संगम मोरे, जिल्हा माध्यम संयोजन शार्दुल भावे, नरेश वराडकर, आरेगावचे सरपंच श्रीकांत महाजन, प्रथमेश परांजपे, प्रसाद जांगळी तसेच ग्रामोन्नती संघ खालचापाट जांगळवाडीचे दिनेश देवाळे, दत्ताराम मालप, बाळाराम मालप, विजय मालप, जयंत देवाळे, लक्ष्मण देवाळे, प्रसाद जांगळी, अनंत देवाळे, नितीन घरट, महादेव मालप, विजय मालप आदी उपस्थित होते.
धडाडीचा कार्यकर्ता
खालचापाट जांगळवाडी येथे रहाणारे संजय मालप बेधडक वृत्तीचे, स्पष्ट बोलणारे म्हणून परिचित आहेत. तरुणपणी राजकारणात सक्रीय झालेले संजय मालप हे १० वर्षांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक होते. राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस म्हणून काम करणाऱ्या संजय मालप यांनी वैयक्तिक कारणास्तव 2013 मध्ये राष्ट्रवादीमधील काम थांबवले. त्यानंतर भाजपमध्ये सक्रीय झाल्यावर शहर भाजयुमो अध्यक्ष अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. 2016 ते 2020 या कालावधीत भाजपचे शहर सरचिटणीस म्हणून काम पाहिले. 2020 पासून भाजयुमोचे तालुकाध्यक्ष असे पद त्यांच्याकडे आहे.
सामाजिक क्षेत्रात कार्यरत
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संजय मालप ज्ञानरश्मी वाचनालयाचे संचालक, ग्रामोन्नती सेवा संघ खालचापाट जांगळवाडी कार्यकारीणी सदस्य आणि जेएमसी क्रीडामंडळ तांबडवाडी संचालक आहेत. कोरोना महामारीच्या संकटात गरजुंना शिधावाटप, एस.टी. डेपो, पोस्ट ऑफीस, पोलीस वसाहत या परिसराचे सॅनिटायझेशन संजय मालप यांनी स्वत: विनामुल्य करुन दिले. गुहागर तालुका भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला त्यावेळी गुहागरातून मदत कार्य पोचविणाऱ्या टीममध्ये संजय मालप यांचा सहभाग होता.
2018 मधील नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना शहर विकास आघाडीकडून उमेदवारी मिळत होती. त्यावेळचे वातावरण शहर विकास आघाडी देईल तो उमेदवार जिंकून येईल असे होते. तरीही पक्षाशी एकनिष्ठ रहाणार असे सांगत त्यांनी उमेदवारी नाकारली होती.