गुहागर, ता. 14 : पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गुहागर तालुका अध्यक्षपदी कोतळूक गावचे सुपुत्र, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Sanjay Gandhi Taluka President Sachin Oak
सचिन ओक यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर सामाजिक कामाची आवड असल्याने वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून कामकाज करताना 2012 पासून कोतळूक ग्रामपंचायत सदस्यपदी ते निवडून आले. त्यानंतर विविध माध्यमातून ते कामकाज करत आहेत. भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका सरचिटणीस, गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन प्रमुख कार्यवाह, महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोतळूक अध्यक्ष, गुहागर तालुका पत्रकार संघाचे सदस्य अशा पदांवर ते कार्यरत आहेत. कोतळूक सारख्या ग्रामीण भागातून येऊन चांगले सामाजिक उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात. Sanjay Gandhi Taluka President Sachin Oak
संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष सचिन ओक यांनी या पदावरून गोरगरीब निराधार कुटुंबांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी, योजनेपासून वंचित राहिलेले लाभार्थी शोधून सर्वांना विश्वासात घेऊन या समितीचे एक अनोखे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तसेच योजनेस पात्र लाभार्थी आहे. परंतु काही कारणांमुळे त्याला लाभ घेता येत नाही अशा लाभार्थींना शासनाच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाब म्हणून मंजूरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत या पदावर शिफारस केल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, माजी आमदार डॉ विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांना धन्यवाद दिले. Sanjay Gandhi Taluka President Sachin Oak