• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 May 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यात समृद्धी आंबेकर प्रथम

by Mayuresh Patnakar
May 13, 2026
in Guhagar
91 1
0
Samruddhi Ambekar Ranks First in Guhagar Taluka
179
SHARES
512
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ मधील माध्यमिक शालांत इ.१० वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने ९९.२० % गुण संपादन करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Samruddhi Ambekar Ranks First in Guhagar Taluka

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची कु.समृद्धी सुरेश आंबेकर हिने माध्यमिक शालांत परीक्षेतील सुयशाबरोबरच वकृत्व, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती सादरीकरण अशा विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये तालुकास्तरीय ते विभागस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सुयश संपादन केले आहे. चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार तसेच प्रा.जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार समृद्धी आंबेकर हिने संपादन केला आहे. बालगटापासून ते इयत्ता दहावीपर्यंत कोणतीही खाजगी शिकवणी नसताना स्वअध्ययनाने इ.१० वी परीक्षेत ९९.२०% गुण संपादन करून सुयश प्राप्त केले आहे. Samruddhi Ambekar Ranks First in Guhagar Taluka

आगामी शैक्षणिक काळात आयएएस होऊन उच्च अधिकारी होऊन सेवाकार्य करण्याचा मानस कु.समृध्दी आंबेकर हिने व्यक्त केला आहे. तसेच नियमित वाचन, दैनंदिन अभ्यास, नियोजनबध्द अभ्यासवृत्ती, अभ्यासाची उजळणी, लेखनाचा सराव, चिंतन व मनन यामुळेच इ.१० वीमध्ये ९९.२०% चे सुयश लाभले आहे. असे समृद्धी आंबेकरने सांगितले. समृद्धी आंबेकरच्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय सुयशाबद्दल अभिनंदन होत आहे. Samruddhi Ambekar Ranks First in Guhagar Taluka

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSamruddhi Ambekar Ranks First in Guhagar Talukaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.