• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महसूलच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

by Manoj Bavdhankar
February 24, 2026
in Maharashtra
23 0
0
46
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 च्या अंमलबजावणी करताची मंडळ स्तरावरील पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. तर दिनांक 7 मार्च पासून तालुक्यात ठीक ठिकाणी मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. Samadhan camp on behalf of Revenue

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गुहागर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एक यामध्ये दिनांक 18 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत मंडळ स्तरावर पूर्व तयारी करण्यात येत आहे. यासाठी गटविकास अधिकारी, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी, भूमि अभिलेख उपअधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची तालुकास्तरावर बैठक घेण्यात आली. विविध प्रकारचे दाखले शिबिरासाठी मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर आधार सेंटरचे नियोजन करण्यात आले. Samadhan camp on behalf of Revenue

तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळा अशा सर्व शाळा निहाय विविध प्रकारचे दाखल्यांसाठी अर्ज व विहित प्रकारचे कागदपत्र घेण्याचे नियोजन करण्यात आले. भोगवटादार वर्ग दोन जमीन भोगवटादार वर्ग एक मध्ये परावर्तित करण्यात आल्या किंवा नाही. याची तपासणी करणे बाकी असल्यास त्याबाबत प्रक्रिया पूर्ण करावी व अद्यावत नोंदणीसह सातबारा लाभार्थ्यांना वितरित करावे. मंडळातील पानंद रस्त्यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतिला उपलब्ध करून देणे. सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिबिरात पट्टे वाटप करणे. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत गावामध्ये सातबारा वाचन पूर्ण करून प्रलंबित नोंदणीच्या याद्या तयार करणे व दुरुस्ती बाबत कार्यवाही करणे. तुकडे बंदी कायदाविरुद्ध 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण बाबत गावनिहाय यादी तयार करणे नोंदणीकृत दस्ताचे आधारे रद्द झालेले तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघनामुळे सातबारा मधील इतर अधिकारातील खरेदीदारांचे नाव इतर अधिकारात नोंदवलेले शेरे व नव्याने प्राप्त अर्जांविषयी फेरफार घेणे. मंडळ स्तरावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे. सातबारा मधील चुकांबाबत अर्ज स्वीकारून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून दुरुस्त्यांची नोंद घेणे. पुरवठा विभागाकडून अंत्योदय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असे पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभ मिळवून देणे. Samadhan camp on behalf of Revenue

यासाठी तालुक्यातील मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 7 मार्च 2026 रोजी गुहागर, पाटपन्हाळे व तळवली, 14 मार्च 2026 रोजी पालशेत, हेदवी, आबलोली. 10 एप्रिल रोजी गुहागर, पाटपन्हाळे व तळवली,  17 एप्रिल 2026 रोजी पालशेत, हेदवी, आबलोली. या ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच 8 मे व 15 मे रोजी गुहागर मंडळ विभागामध्ये गुहागर नगरपंचायत अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रभारी तहसीलदार विद्याधर वैशंपायन यांनी दिली. Samadhan camp on behalf of Revenue

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSamadhan camp on behalf of Revenueटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet12
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.