साहिल दाभोळकरला भारतीय मेरीटाईम युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस पदवीमध्ये सुवर्ण पदक
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील वेलदुर सिद्धेश्वर नगर येथील साहिल विठोबा दाभोळकर याला इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मुंबई पोर्ट कॅम्पस (भारत सरकार) भारतीय मेरीटाईम युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस पदवीमध्ये सुवर्ण पदक मिळविले असून सुवर्णपदक व पदवी राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. Sahil was awarded the degree by the President


साहिल दाभोळकर याने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग, इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मुंबई पोर्ट कॅम्पस (भारत सरकार) भारतीय मेरीटाईम युनिव्हर्सिटीमध्ये केले. या सर्व कॅम्पसमध्ये त्याला सुवर्ण पदक मिळाले होते. इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी चेन्नई (बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय विद्यापीठ, भारत सरकार) च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भारताच्या राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्णपदक व पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. Sahil was awarded the degree by the President


यावेळी बोलताना साहिल दाभोलकर यांनी सांगितले की, मला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुवर्ण पदक आणि पदवी प्रदान करण्यात आली. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. माझ्या प्रयत्नांमध्ये लागलेल्या कठोर परिश्रमाचा आणि समर्पणाचा दाखला आहे. माझ्या आई बाबांचा, कुटुंबाच्या, समाजाच्या अतुलनीय पाठिंब्याशिवाय, माझ्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि माझ्या सहकाऱ्यांच्या प्रोत्साहनाशिवाय असा पुरस्कार मिळणे शक्य झाले नसते. माझे आजोबा कै. अंबाजी दाभोळकर यांचा माझ्यावरील विश्वास माझ्या यशामागे एक प्रेरक शक्ती आहे आणि त्यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे, असे सांगितले. Sahil was awarded the degree by the President


यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल श्री आर. एन. रवी, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री श्री. सर्बानंद सोनोवाल, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री. शंतनू ठाकूर आदी उपस्थित होते. Sahil was awarded the degree by the President