• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 April 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेने समाजकार्य करावे

by Guhagar News
April 27, 2026
in Maharashtra
20 0
0
Saath Saath Charitable Trust
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अनिल दधीच; विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन

गुहागर, ता. 27 : साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट चे काम कौतुकास्पद आहे. या माध्यमातून संस्थेने समाजकार्य करावे. या कार्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू या, असे प्रतिपादन जिंदाल ग्रुपचे, जयगडच्या प्रकल्पाचे, सीएसआर प्रमुख अनिल दधीच यांनी केले. Saath Saath Charitable Trust

सा़थ साथ चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पाच्या बहुउद्देशीय सभागृह, गणेश पत्री उद्यान, मेडिकल रूम, प्ले एरिया, लायब्ररी इत्यादी वस्तूंचं व सुविधांच उद्घाटन यावेळी बोलत होते. या कार्यक्रमाला जोग हॉटेल जयगडचे मालक, तसेच श्री विवेकानंद रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे ट्रस्टी शरद जोशी, पदाधिकारी  विवेक शेंडे उपस्थित होते. Saath Saath Charitable Trust

यावेळी अनील दधीच यांच्या हस्ते  गणेश पत्री उद्यान व उद्यानात जेष्ठांसाठी बसवलेली व्यायामाची साधन, तसेच झोपाळे व बाकडी यांचे उद्घाटन केले. तर जोग साहेबांनी मेडिकल रूम, प्ले एरिया व लायब्ररी या वास्तूचे उद्घाटन केले. तसेच  विवेक शेंडे साहेबांनी  बहुउद्देशीय सभागृह याचे उद्घाटन केले.  तसेच तरुणांची उपस्थिती पाहून ते म्हणाले, या कार्यात या प्रकल्पाची पुढील वाटचाल ही चांगली होईल हे या तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे प्रतिपादित होत आहे, असे विचार मांडले. Saath Saath Charitable Trust

विवेक शेंडे साहेबांनी आपल्याबरोबर स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात काम करण्याची इच्छा परत एकदा अधोरेखित केली. आजपर्यंत महिला बचतगटासाठी जॉईंट व्हेंचर मध्ये आम्ही चार प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत. तसेच संस्था अनंत अडचणींवर मात करत चांगले कार्य करत असल्याचे सांगितले. आता ज्येष्ठांना आवश्यक सर्व सोयीसुविधांनी सुसह्य असा हा प्रकल्प असल्याचा निर्वाळा दिला. Saath Saath Charitable Trust

संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री शरद जोशी यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले तसेच या प्रकल्पाच्या वाटचाली मागे व यशामागे सर्व ट्रस्टी, हितचिंतक, देणगीदार तसेच सर्व स्टाफ यांचे हे श्रेय असून त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे असे सांगितले. प्रास्तविकामध्ये सौ मानसी राऊत यांनी सर्वांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाची आतापर्यंतची वाटचाल चालू असून खूप छान प्रगती होत असल्याचे प्रतिपादन केले. Saath Saath Charitable Trust

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSaath Saath Charitable Trustटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.