मोडकाआगरात बागांचे नुकसान, तोडून ठेवलेली लाकडे उचलली नाहीत
गुहागर,ता. 15 : मोडकाआगर येथे वणवा (Rural Fire Outraged) लागुन काजु,आंबा बागायतदाराचे नुकसान. महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेराच्या निष्काळजीपणामुळे (Negligence of the Road Contractor) वणव्याने अधिकच तीव्र रूप धारण केले. 40 वर्षांत प्रथमच या भागात वणवा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. (Rural Fire Outraged)


सोमवारी (ता. 14) दुपारी मोडकाआगर येथे वणवा लागला. गेले दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट आहे. गुहागर तालुक्यातील दुपारच्या वेळी 37 ते 38 डिग्री सेल्सिएस इतके तापमान वाढत आहे. या वाढलेल्या तापमानामुळेच वणवा (Rural Fire Outraged) लागला असावा. अशी शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


मोडकाआगर येथील विवा बिअरशॉपी समोर राजेंद्र आरेकर याचे मालकीचे जागेत महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदाराने लाकडांचा ढीग करुन ठेवला होता. ही लाकडे महामार्गाचे काम सुरू असतांना परिसरातील रूंदीकरणाच्या वेळी तोडण्यात आली होती. झाडे तोडुन अनेक महिने झाल्याने ती पुर्णपणे सुकली होती. या सुक्या लाकडांजवळ वणवा आल्यावर आणखी भडकला व मोठ्या प्रमाणात पसरला. यामध्ये आरेकर, बावधनकर, दीक्षित आदी ग्रामस्थांनी लागवड केलेल्या आंबा काजु बागायतीचे मोठे नुकसान झाले. सध्या महामार्गाच्या क्रॉक्रिटीकरणावर पाणी मारण्याचे काम सुरु आहे. तसेच लाखो लिटर पाणी वणवा लागलेल्या परिसरातील मोडकाआगर धरणातून ठेकेदार रोज टँकरमधुन वहातूक करत असतो. जर ठेकेदाराने वेळीच टँकरने पाणी मारले असते तर कदाचित वणवा मोठ्या प्रमाणात पसरला नसता. (Rural Fire Outraged)


आजही महामार्गावर ठेकेदाराने काही ठिकाणी तोडलेल्या झाडांचे ढीग करुन ठेवलेले आहेत. तापमानवाढीमुळे वणव्या लागण्याचे प्रमाण वाढल्याने ही सुखी लाकडे वणवा पसरविण्यासाठी धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे ही लाकडे उचलून न्यावीत. अशी मागणी अनेक वेळा जागा मालकांनी ठेकेदाराकडे केली. मात्र तरीही ठेकेदाराचे दुर्लक्षच (Negligence of the Road Contractor) होत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी तरी ठेकेदाराला लाकडे उचलण्यास सांगणार का असा प्रश्र्न ग्रामस्थ विचारत आहेत. (Rural Fire Outraged)
वणव्यामध्ये बागेचे सर्वाधिक नुकसान झालेले ग्रामस्थ राजेंद्र आरेकर म्हणाले की, महामार्गाचे बाजुला असलेली झाङे तोडुन माझ्या जागेत टाकली होती. मी काही महिन्यांपूर्वीच ठेकेदाराला उचलायला सांगितली होती. त्यानी दोन दिवसात ही झाङे ऊचलुन टाकण्याचे अश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत ही झाङे ऊचलली नाहीत. ही झाङे वेळीच उचलली असती तर आज वणव्याने तीव्र रूप धारण केले नसते. बागायतदारांचे कमी नुकसान झाले असते. (Rural Fire Outraged)

