• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 November 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘महाराष्ट्र राज्य – ग्रामविकास परिषद, दिल्ली’

by Mayuresh Patnakar
November 2, 2026
in Guhagar
21 1
0
Rural Development Council

'महाराष्ट्र ग्रामविकास परिषद,दिल्ली' च्या नियोजन बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिप अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांना निमंत्रित करताना श्री.योगेश पाटील,श्री.प्रकाशराव महाले,श्री.संतोष राणे व श्री.प्रभाकर खानविलकर

42
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ आयोजित

गुहागर, ता. 02 : ‘एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ च्या अंतर्गत ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्यावतीने व ‘राष्ट्रीय जिप व पंस सदस्य असोसिएशन’ च्या सहकार्याने दिल्ली येथे ‘महाराष्ट्र राज्य – ग्रामविकास परिषद, दिल्ली’ चे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. Rural Development Council

केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या विद्यमान महोदयांपुढे केंद्र शासनाशी निगडित असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकासासंबंधीत विविध समस्या, प्रश्न आणि ज्वलंत विषयांचे अभ्यासपूर्वक सादरीकरण करावे व त्यांच्या निराकारणासाठी केंद्र शासनाने ठोस उपाययोजना करावी, यासाठी ही परिषद दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे. Rural Development Council

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे मंत्री श्री.जयकुमार गोरे तसेच महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या 14 जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,महाराष्ट्रातील निवडक सरपंच व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे निवडक पदाधिकारी यांना दिल्ली येथील परिषदेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. Rural Development Council

दिल्ली येथील ‘महाराष्ट्र राज्य – ग्रामविकास परिषदे’त केंद्रीय मंत्र्यांना सादर करण्याचे लेखी निवेदन अभ्यासपूर्वकरीत्या तयार करण्यासाठी व कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्यासाठी प्रथमतः ‘एमआयटी, पुणे’ येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चे प्रणेते डॉ.राहुलजी कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल.राज्यातील विद्यमान जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष,निवडक सरपंच व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे निवडक पदाधिकारी यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येत आहे. Rural Development Council

‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक श्री.योगेश पाटील, उपाध्यक्ष व सहसमन्वयक श्री. प्रकाशराव महाले,कोकण विभाग अध्यक्ष श्री. संतोष राणे व रत्नागिरी जिल्हा समन्वयक  श्री.प्रभाकर खानविलकर यांनी अध्यक्ष सौ. अस्मिताताई केंद्रे यांची रत्नागिरी येथे भेट घेतली, परिषदेविषयी सविस्तर चर्चा केली व नियोजन बैठकीचे निमंत्रण दिले. Rural Development Council

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRural Development Councilटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.