पालकमंत्री ॲड. अनिल परब : मदत निधी वाटप तात्काळ सुरू करण्याचे निर्देश
रत्नागिरी दि. 22 : जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हयामध्ये पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना यापूर्वी तात्कालीक मदत म्हणून 2 कोटी 64 लाख 33 हजार रुपये निधी देण्यात आली आहे. 21 सप्टेंबर 2021 च्या आदेशान्वये 44 कोटी 29 लाख 17 हजार रुपये निधी प्राप्त असून एकूण 46 कोटी 93 लाख 50 हजार रुपये एवढा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भाडी/कपडे व घरगुती वस्तूंसाठी सानुग्रह अनुदान, मृत जनावरांसाठी मदत, पूर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळयांसाठी अर्थसहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार व कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत, शेत जमिनीसाठी मदत व इतर अनुशेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) व राज्य शासनाचा निधी (State Fund) अंतर्गत निधीची मागणी करण्यात आली होती.
विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी 26 जुलै 2021 रोजीच्या आदेशान्वये मृत व्यक्ती, भांडी/कपड़े व घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी उणे प्राधिकार पत्राने अनुदान वितरीत करण्यात मान्यता दिली होती. तसेच विभागीय आयुक्त कोकण विभाग यांजकडील 9 ऑगस्ट 2021 रोजीच्या आदेशान्वये, भांडी/कपडे व घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी 2 कोटी 64 लाख 33 हजार रुपये निधी प्राप्त झाला. त्यानुसार, बाधितांना निधी वाटपाची कार्यवाही यापूर्वीच करण्यात आली आहे.
उर्वरित अनुज्ञेय बाबींसाठी शासनाच्या महसूल व वन विभाग यांजकडील दिनांक 16 सप्टेंबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य आपती प्रतिसाद निधीमधून 7 कोटी 48 लाख 5 हजार रुपये व राज्य शासन निधीमधून 36 कोटी 81 लाख 12 हजार रुपये असे एकूण 44 कोटी 29 लाख 17 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सदरचा निधी वितरणाचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
कपडे तसेच घरगुती भांडी वस्तुंकरीता अर्थसहाय 7 कोटी 32 लाख 90 हजार रुपये ( सदर रकमेमध्ये यापूर्वीच्या 2 कोटी 64 लाख 33 हजार रुपये मदत रकमेचा समावेश आहे) मृत जनावरांसाठी मदत 2 कोटी 90 लाख 88 हजार रुपये, पूर्णत: नष्ट अंशत: पडझड झालेली कच्ची व पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी अनुदान 7 कोटी 64 लाख 72 हजार रुपये, मत्स्यव्यवसायासाठी मदत 2 लाख 23 हजार रुपये, हस्तकला/हातमाग कारागिर, बारा बलुतेदार यांना मदत 14 लाख 1 हजार रुपये, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अर्थसहाय्य 2 कोटी 36 लाख रुपये, दुकानदारांना मदत 25 कोटी 55 लाख 56 हजार रुपये, टपरीधारकांना मदत 96 लाख 60 हजार रुपये, कुक्कुटशेडच्या नुकसानीसाठी मदत 60 हजार रुपये.
बाधित नागरिकांना निधीचे वाटप तहसिलदारांमार्फत करण्यात येत असून संबंधित तालुक्यांना त्यांच्या मागणीनुसार निधीचे वितरण करण्यात आले आहे. निधी वाटपाची कार्यवाही सर्व पात्र बाधितांना तात्काळ करण्याबाबत तहसिलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.
(