गुहागर, ता. 28 : शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या इयत्ता बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. Rotary School students felicitated
सरस्वती मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केल्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे यांच्या शुभहस्ते प्रमुख मान्यवर गृहराज्यमंत्री व दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री. योगेशदादा कदम यांचे शाल, श्रीफळ, दूर्गामातेची मूर्ती तसेच कलाशिक्षक प्रा. शुभम घड्याळ यांनी रेखाटलेले पोर्टेट तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. राजन इंदूलकर यांचे शाल, श्रीफळ व श्रीगणेशाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. तसेच रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी मा. रो. पराग चिखले यांच्या शुभहस्ते माजी आमदार मा. श्री. संजयराव कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख मा. श्री. शशिकांत चव्हाण, खेडचे शिक्षणाधिकारी मा. श्री. विजय बाईत यांचे श्रीफळ व पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत केले. Rotary School students felicitated


या सत्कार सोहळ्यातील गुणवंतांमध्ये जे.ई.ई., बी. आर्च. परीक्षेत 100 पर्सेनटाईल गुण प्राप्त करत देशात प्रथम येण्याचा नवा विक्रम रचणारा कु. नील पाटणे त्याचबरोबर जे.ई.ई. ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण होऊन नामांकित आय. आय. टी. कॉलेजमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांमधील कोकण विभागात प्रथम आलेला कु. ओम जैन तसेच कु. नील लिमये, कु. केवल खापरे, कु. अश्लेषा देवधर, कु. साहिल अंगज, कु. मानस राऊल, कु. गौरव पाटील, कु. सुयश नवरंग, कु. तेजस कुमार, कु. अन्वयी तांबे, कु. रोनक शेठ, कु. ऐनेश मालंडकर, कु. असित पवार व कु. हर्ष पवार Rotary School students felicitated
नीट प्रवेश परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालामधील कु. राहिल मुजावर व कु. वरद थोरात तसेच 99 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवणारे कु. स्वरांगी मोरे, कु. सोनम महाले , 98 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवणारे कु. मुक्ता गोखले, कु. यश माळी, कु. सृष्टी भोजने, कु. पियुष घुगरे, कु. तन्वी जैन Rotary School students felicitated
एम.एच.टी. सी.ई.टी. पी.सी.एम. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमधील 99 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवलेले कु. सेजल पेडणेकर, कु. अर्चना पाटील, कु. ओम जैन, नील लिमये, कु. सुरज गिम्हवणेकर, कु. अश्लेषा देवधर, कु. संस्कार साळवी, कु. तेजस कुमार, कु. पार्थ लिंगायत, कु. दिगंत हेगडे, कु. अथर्व चव्हाण, कु. वरद मेणकर, कु. अन्वयी तांबे, कु. गौरव पाटील, कु. मानस राऊल, कु. हर्ष जैन, तसेच 98 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले कु. कृष्णा कुलकर्णी, कु. अर्जुन केळकर, कु. विराज चाळके Rotary School students felicitated


एम.एच.टी. सी.ई.टी. पी.सी.बी. परीक्षेतील यशस्वी 99 पर्सेनटाईल गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. यश माळी, कु. तीर्था वैद्य व कु. यश सप्रे, कु. सिद्रा पंजारी, कु. शर्वरी घाडगे, कु. धृव साळवी, 98 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले कु. समृद्धी कुडाळकर, कु. तेजल भगत, कु. केतकी चिखले, कु. सिद्धी महाबळ, कु. ओंकार मनवळ, कु. दुर्गा पाद्धे, कु. निरजा माळी Rotary School students felicitated
इयत्ता 12 वी बोर्डाच्या विज्ञान शाखेच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणारे कु. केवल खापरे, कु. सोनम महाले तर कु. सेजल पेडणेकर त्याचबरोबर इ.12वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणारे कु. वेदांत ओक, कु. श्रीश शेट तर कु. शल्तियल काळे तसेच जे.ई.ई., नीट, बी. आर्च., एम.एच.टी. सी.ई.टी. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवर गृहराज्यमंत्री व दापोली-खेड -मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री. योगेशदादा कदम यांच्या शुभहस्ते घड्याळ, स्टेथोस्कोप व फ्रेम देऊन गौरविण्यात आले. Rotary School students felicitated
गृहराज्यमंत्री व दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री. योगेशदादा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नसल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी हार न मानता नव्या उमेदीने यशाच्या दिशेने मार्गक्रमण केले पाहिजे. रोटरी स्कूलने जे.ई.ई, नीट आणि सी.ई.टी. यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून खेड तालुक्याची मान शैक्षणिक क्षेत्रात उंचावली आहे. हे स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यात त्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. नकारात्मक विचार न करता सकारात्मक बनने गरजेचे आहे. कोणताही दबाव न बाळगता यश संपादन केले पाहिजे. रोटरी स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत आहे, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती न पाहता आपल्याला कोणते ध्येय गाठायचे आहे, तेथे लक्ष केंद्रित केले पाहिजे. मेहनतीला पर्याय नाही. मेहनतीमध्ये यश लपले आहे. विद्यार्थ्यांनी पालकांसोबत त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचेही आभार मानले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांना व रोटरी शाळेला त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary School students felicitated
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांचे आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कृणाल मंडलिक, सौ. भक्ती करंबेळकर व सौ. सरिता भारती यांनी केले. Rotary School students felicitated