• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरजीपीपीएलचे भविष्य अंधारमय ?

by Mayuresh Patnakar
September 18, 2021
in Old News
17 0
1
आरजीपीपीएलचे भविष्य अंधारमय ?
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अपुऱ्या गॅसपुरवठ्यामुळे केवळ वीज निर्मितीवर परिणाम

गुहागर, ता. 18 : महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पाचे भविष्य म्हणून अनिश्चिततेकडे वाटचाल करत आहे. अपूऱ्या गॅस पुरवठ्यामुळे 1964 मेगावॅटची क्षमता असलेल्या आरजीपीपीएलमध्ये सध्या केवळ 200 मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च जास्त अशी प्रकल्पाची स्थिती आहे.
Due to insufficient gas supply, Ratnagiri Gas and Power Project, A well known largest power generation project in Maharashtra, going to Shutdown. RGPPL, which has a capacity of 1964 MW, is currently generating only 200 MW.

देशात निर्माण होणाऱ्या गॅस वापराचा प्राधान्यक्रमात वीजनिर्मिती प्रकल्पांना सर्वांत शेवटी ठेवण्यात आले आहे. घरगुती, खतनिर्मितीसाठी, वाहनांसाठी देवून शिल्लक गॅस वीजनिर्मितीकडे वळवला जातो. त्यामुळे कावेरी बेसिनमधुन आरजीपीपीएलला मिळणारा गॅस 7.6 एमएमएससीएमडी  ५ वर्षांपूर्वी बंद झाला. केवळ ओएनजेसीमधुन येणाऱ्या 0.09 एमएमएससीएमडी गॅसवर हा प्रकल्प तग धरुन होता. एवढ्या गॅसवर कंपनीमधील तीन जनित्रांपैकी एक जनित्र सुरू असते. त्याद्वारे 500 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. ही वीज भारतीय रेल्वे विकत घेत असे. भारतीय रेल्वेसोबतचा कराराची मुदत संपत आली आहे. तोपर्यंत ओएनजेसीकडून केवळ 0.02 एमएमएससीएमडी गॅसचा पुरवठा होईल. असा आधार आरजीपीपीएल व्यवस्थापनाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यात हा गॅस पुरवठा देखील अनियमीत झाला आहे. त्यामुळेच या कंपनीचे भवितव्य अंधारात आहे.
Power generation projects are the last priority in the country’s gas consumption. The surplus gas is diverted to power generation by paying for domestic, composting industry and the vehicles. As a result, the 7.6 MMSCMD gas supplied to RGPPL from the K Basin was cut off five years ago. The project is running on 0.09 MMSCMD of gas coming from ONJC alone. RGPPL generates 500 MW power and supply to Indian Railway. The Contract also ending after 2 Months. But from Last 3 Months ONGS also not supplying sufficient Gas to RGPPL. That’s why RGPPL is going to Shutdown….?

परदेशातून येणाऱ्या गॅसवर आरजीपीपीएल पूर्ण क्षमतेने 1964 मेगावॅट वीजनिर्मिती करु शकते. मात्र ही वीज देशातील कोणत्याच आस्थापनेला परवडत नाही. त्यामुळे खासगी उद्योग क्षेत्र देखील आरजीपीपीएलकडून महागडी वीज घेण्यास अनुकुल नाहीत.
RGPPL can generate 1964 MW at full capacity on imported gas. However, this power is not affordable to any establishment in the country. Therefore, even the private sector is not in favor of buying expensive power from RGPPL.
अन्य प्रकारातील वीजेबरोबर ही वीज केंद्र किंवा राज्य सरकारने घेतली तर वीजेचा प्रति युनिट सरासरी दर कमी होवू शकतो. असे सुत्र सध्या कंपनीकडून सांगितले जात आहे. कंपनीकडून या संदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती मिळत नाही. मात्र आरजीपीपीएल व्यवस्थापनाने ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांची भेट घेवून चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  ही कंपनी बंद पडली तर शेकडो स्थानिक कामगारांचे भवितव्यही अंधारमय होईल. त्यामुळे ही कंपनी सुरु रहावी यासाठी लोकप्रतिनिधींनी आटोकाट प्रयत्न करावेत. अशी मागणी स्थानिक कामगार करत आहेत.

Tags: 200 MWBreaking Newscapacity of 1964 MWGasGuhagar Newsinsufficient gas supplyLatest Marathi NewsLatest NewsMaharashtraMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiONJCPowerprojectratnagiriRgpplShutdownटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.