• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 July 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील सोमेश्वर तलावाचे होणार पुनरुज्जीवन

by Mayuresh Patnakar
July 4, 2026
in Guhagar
86 1
0
Revival of Someshwar Lake in Guhagar
169
SHARES
483
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अमृत २.० अभियानातून १८ लाखांचा निधी; पर्यटनाला मिळणार चालना

गुहागर, ता. 04 : गुहागर शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या सोमेश्वर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रियेतील अडथळे दूर झाल्यानंतर आता या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. Revival of Someshwar Lake in Guhagar

गुहागर शहरातील सोमेश्वर मंदिर परिसरातील हा तलाव अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. त्यामुळे तलावातील गाळ काढणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आणि पर्यावरणपूरक विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत होती. प्रारंभीच्या दोन निविदा प्रक्रियांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर पुन्हा निविदा काढण्यात आली असून, कमी दराची निविदा प्राप्त झाल्याने कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित ठेकेदाराने अंदाजित खर्चापेक्षा कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. Revival of Someshwar Lake in Guhagar

या प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढणे, घाटांची दुरुस्ती, परिसराचे सुशोभीकरण, आवश्यक संरक्षक कामे तसेच पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या कामामुळे सोमेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. Revival of Someshwar Lake in Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRevival of Someshwar Lake in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet42
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.