गुहागर, ता. 23 : शहरातील रिक्षा चालक पराग कमलाकर भोसले यांना बाजारपेठेमध्ये रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट सापडले. भोसले यांनी प्रामाणिकपणे ते पाकिटाचे मालक सलोनी शेखर विखारे हिला परत केले. Returned the wallet lying on the street


गुहागर एसटी. डेपो समोरील रिक्षा स्टॅन्ड जवळ शनिवारी ८ हजार ५०० रुपयांचे पैशांचे पाकीट रिक्षा चालक व सामाजिक कार्यकर्ते पराग कमलाकर भोसले यांना सापडले होते. हे पाकीट एका पतसंस्थेची पिग्मी एजंट सलोनी शेखर विखारे हिचे असल्याचे पूर्णपणे खातरजमा केले. त्यानंतर हे पैशाचे पाकीट सलोनी विखारे हिला परत देण्यात आले. रिक्षाचालक पराग भोसले यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गुहागर शहर रिक्षा चालक-मालक संघटना व विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. Returned the wallet lying on the street