गुहागर, ता. 23 : तालुक्यातील देवघर येथील अजित गुजर यांची देवघर ते असगोली दरम्यान हरवलेली दोन तोळ्यांची सोन्याची चेन असगोली येथील स्नेहा संतोष गुरव यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाली. Returned the lost gold chain
देवघर ते असगोली दरम्यान मोटारसायकलवरून प्रवास करत असताना देवघर येथील अजित गुजर यांची दोन तोळ्यांची सोन्याची चेन हरवली होती. चेन हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. चेन सापडल्यास दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच चेन परत आणून देणाऱ्या व्यक्तीस योग्य बक्षीस दिले जाईल, असे आवाहन करण्यात आले होते. Returned the lost gold chain
असगोली येथील स्नेहा संतोष गुरव यांना रस्त्यावर ही सोन्याची चेन सापडली होती. त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांना ही बातमी दिली. ही बातमी समजताच अजित गुजर यांनी तातडीने असगोली येथे जाऊन स्नेहा गुरव व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले आणि हरवलेली सोन्याची चेन सुखरूपपणे आपल्या ताब्यात घेतली. Returned the lost gold chain
आजच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना, जवळपास दोन तोळ्यांची सोन्याची चेन स्वतःकडे न ठेवता ती तिच्या मूळ मालकापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिकपणा स्नेहा संतोष गुरव यांनी दाखवला. पैशापेक्षा माणुसकी मोठी असते, याचा प्रत्यय त्यांच्या या कृतीतून आला. स्नेहा संतोष गुरव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे. Returned the lost gold chain
