• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे येथे सेवानिवृत्ती गौरव सोहळा

by Mayuresh Patnakar
October 5, 2023
in Guhagar
108 1
0
Retirement felicitation ceremony at Khodde
212
SHARES
605
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दशरथ साळवी यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी – आ. भास्करशेठ जाधव

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटणारा शिक्षक म्हणजेच दशरथ साळवी यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. असे स्पष्ट मत माजी नगरविकास राज्यमंत्री तथा गुहागरचे आमदार श्री.भास्करशेठ जाधव यांनी केले. खोडदे येथील साळवी यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. Retirement felicitation ceremony at Khodde

Retirement felicitation ceremony at Khodde

गुहागर तालुक्यातील खोडदे येथील यशदा मंगल कार्यालय खोडदे येथे श्री.दशरथ रघुनाथ साळवी यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा निवृत्ती गौरव समीतीच्या वतीने व दशरथ साळवी यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गौरव समीती अध्यक्ष श्री.तुकाराम निवाते यांचे अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला माजी मंत्री व गुहागरचे आमदार श्री.भास्करशेठ जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचे हस्ते दशरथ साळवी यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. Retirement felicitation ceremony at Khodde

यावेळी मार्गदर्शन करताना आ. श्री.भास्करशेठ जाधव म्हणाले की, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.दशरथ रघुनाथ साळवी यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकले आहेत. तर अनेक विद्यार्थांची निवड नवोदय विद्यालयासाठी झालेली आहे. काजुर्ली मानवाडी नं. २ या खेडेगावातील  विद्यार्थीनीने कु. सोनाली मोहन डिंगणकर हि संशोधनासाठी इस्त्रो आणि नासा अमेरिका येथे जाऊ शकली. अशा विद्यार्थ्यांना घडविणा-या शिक्षकाच्या अडचणीच्या वेळी पाठीशी ठामपणे उभा राहिलो. याचा सार्थ अभिमान वाटतो. साळवी गुरुजी यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर गोर गरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळ द्यावा. मी सदैव आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे. असेही आमदार श्री.भास्करशेठ जाधव यांनी आवर्जून सांगितले. Retirement felicitation ceremony at Khodde

यावेळी विचार पिठावर शिवसेनेचे गुहागर तालुका प्रमुख श्री.सचिनशेठ बाईत, श्री.तुकाराम निवाते, सत्कार मुर्ती श्री.दशरथ साळवी, सौ.सुवर्णा साळवी, शरद साळवी, शिवसेनेचे तालुका सचिव श्री.विलास गुरव, आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी नेटके, काजुर्लीच्या सरपंच  श्रीमती.रुक्मिणी सुवरे, खोडदेच्या उपसरपंच कु. पुजा गुरव, वसुधा साळवी, श्री.बळीराम मोरे, दिलीप  महाडीक, रुपेश जाधव, शशिकांत सकपाळ, प्रदिप पवार, अरविंद पालकर, नरेश निमुणकर, सुहास गायकवाड, संदेश सावंत, सुनील गुडेकर, रविंद्र कुळ्ये, गणपत पांचाळ, तसेच साळवी कुटुंबातील सर्व सदस्य व आबलोली, खोडदे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, महिला – पुरुष आणि शिक्षक बंधू-भगीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. Retirement felicitation ceremony at Khodde

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRetirement felicitation ceremony at Khoddeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.