उमराठ येथे कला संगम समुहातर्फे आयोजन
जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील मौजे उमराठ गावात कला संगम समुहातर्फे प्रथमच नुकत्याच झालेल्या गणपती-गौरी सणामध्ये घरगुती सजावट स्पर्धा २०२३ (वर्ष पहिले – उमराठ गाव मर्यादित) आयोजित केली होती. ही स्पर्धा उमराठ गाव अंतर्गत व कोंडवीवाडी अंतर्गत घेण्यात आली होती. यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पा साठी आरास सजवा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या डेकोरेशन सहित एक मिनिटाचा व्हिडीओ व्हॉट्सॲपवर पाठवा. असे आवाहन कला संगम समुहातर्फे करण्यात आले होते. यावेळी सर्वच गणेश भक्तांनी केलेली सजावट अप्रतिम होती. Result of Ganapati Decoration Competition


त्यानुसार उमराठ गावातील १६ गणेश भक्तांनी स्पर्धेत भाग घेऊन फोटो व व्हिडीओ सजावटीसहीत आयोजक कला संगम समुहाकडे पाठवले होते. या सजावट स्पर्धेत संत गोरा कुंभार देखावा साकार करणारे श्री महेंद्र गावणंग, उमराठ धारवाडी यांना प्रथम क्रमांकाचे विजेते, स्वराज्य निर्माते शिवछत्रपती महाराज देखावा साकार करणारे श्री सुयोग आंबेकर, उमराठ खुर्द आंबेकरवाडी यांना द्वितीय क्रमांकाचे विजेते तर पश्चिम रेल्वे देखावा साकार करणारे श्री. किशोर राणे, उमराठ गोरिवले वाडी यांना तृतीय क्रमांकाचे विजेते म्हणून कला संगम समुहा तर्फे घोषित करण्यात आले. Result of Ganapati Decoration Competition


तसेच कला संगम समुहाने कोंडवीवाडी अंतर्गत जाहीर केलेल्या स्पर्धेत १५ गणेश भक्तांनी भाग घेतला होता. त्यामध्ये सभागृहाची प्रतिकृती साकार करणारे श्री. संदेश गावणंग यांना प्रथम क्रमांकाचे, चंद्रायान साकार करणारे श्री सौरभ धनावडे यांना द्वितीय क्रमांकाचे तर चालू घड्याळाची प्रतिकृती साकार करणारे श्री प्रथमेश गावणंग यांना तृतीय क्रमांकाचे आणि कु. प्रतिक कृष्णा गावणंग व कु. उमेश गावणंग यांना उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. सहभागी स्पर्धकांना कला संगम समुहाचे आयोजक योगेश गावणंग, मंगेश गावणंग आणि वैभव धनावडे यांनी शुभेच्छा दिल्या. Result of Ganapati Decoration Competition


मौजे उमराठ गावात अशा प्रकारची घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करून गावातील गणेश भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांच्या कला-कौशल्यांना अधिक प्रोत्साहन आणि संधी दिल्याबद्दल कला संगम समुहाचे तसेच सदर स्पर्धेत भाग घेणारे सर्व स्पर्धकांचे आणि अंतिम विजेते स्पर्धकांचे निर्मल ग्रामपंचायत उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. Result of Ganapati Decoration Competition