गुहागर, ता. 01 : तहसीलदार सौ. वराळे यांच्या सूचनावजा आदेशानंतर श्रृंगारतळी बाजारपेठेत बुधवारी (ता. 1) कोरोना चाचण्यांना सुरवात झाली. दिवसभरात 234 व्यापारी आणि दुकानांमधील कर्मचारी यांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेतली.
मंगळवारी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात दुकाने सुरु ठेवायची असतील तर कोरोना चाचणी करुन घ्या. अशी आग्रही सुचनां शृंगारतळीवरील व्यापाऱ्यांना केली होती. Corona tests began on Wednesday 1st Sept. at the Shringartali market following a notice from Tahasildar Mrs. Warale. During the day, 234 traders and shop staff took the RTPCR test.
ही सूचना व्यापाऱ्यांनी मान्य केली. त्याप्रमाणे शृंगारतळी बाजारपेठेत बुधवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या साह्याने आरटीपीसीआर तपासणी केंद्र सुरु करण्यात आले. तपासणी केंद्र सुरु करताना तहसीलदार सौ. वराळे, गटविकास अधिकारी डॉ. भोसले, प्र. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगिड उपस्थित होते. While starting the RTPCR Test center, Tehsildar Mrs. Pratibha Warale, Block Development Officer Dr. Amol Bhosale, Taluka Health Officer Dr. Jangid was present.
मंगळवार सकाळपासूनच तपासणी केंद्रावर व्यापारी आणि दुकानांमधील कर्मचारी यांनी आरटीपीसीआर टेस्टसाठी रांग लावली. दिवसभरात 234 जणांनी आपल्या स्वॅबचे नमुने दिले आहेत. हे तपासणी केंद्र आणखी तीन दिवस शृंगारतळीत सुरु रहाणार आहे. The RTPCR Test Center will be open for another three days.