गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल बोरभाटलेवाडी येथील मुलामुलींनी ग्रामदेवता सहाण येथील पटांगणात सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. नुकत्याच युनेस्को ने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ल्यांपैकी कोकणातला सुवर्णदुर्ग हा एक किल्ला आहे. गेल्या काही वर्षात जंजिरा, गोपाळगड, दातेगड, गोविंदगड अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती या मुलांनी साकारलेल्या होत्या. Replica of Suvarnadurg Fort

हा किल्ला बनविण्यासाठी शिवकन्या ग्रुपच्या श्रेया गुळेकर, सानिया साटले, निधी गुळेकर, शर्वरी गुळेकर, कोमल गुळेकर, आर्या गुळेकर, वैदही दुर्गोळी, वेदांत गुळेकर, स्वराज भुवड, अथर्व घडशी, मिथिल मळेकर, स्वराज शिंदे, साई गुळेकर या सर्वांनी सुवर्णदुर्ग किल्ला प्रतिकृती बनवली आहे . तसेच अमर गुळेकर, लतेश दुर्गोळी, संतोष गुळेकर यांनीही किल्ला बनवण्यात मदत केली. वाडीतील ग्रामस्थांनीही मुलांना चांगले सहकार्य केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची प्रेरणा घेत त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्याचे जपणूक आणि किल्ले संवर्धन याचा संदेश देण्यात आला. Replica of Suvarnadurg Fort

