• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेलीतील जमीनप्रकरणी आरेकरांना उच्च न्यायालयात दिलासा

by Manoj Bavdhankar
July 22, 2026
in Guhagar
16 0
0
Relief for Arekars in land case in High Court
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील काम करू नये; कोल्हापूर खंडपीठाचे निर्देश

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली येथील सर्व्हे क्रमांक ५५५/१ या जमिनीसंदर्भात जमीनमालक महेंद्र सीताराम आरेकर यांनी शासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Relief for Arekars in land case in High Court

गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित जमिनीतून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ही जागा पूर्वीच भूसंपादित करण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. याला आव्हान देत महेंद्र आरेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. Relief for Arekars in land case in High Court

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती नंदेश पांडे व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने संबंधित जमिनीची राष्ट्रीय महामार्ग अथवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता असल्यास भूसंपादन कायद्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पुढील काम करावे, असे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

सुनावणीदरम्यान जमीनमालकांच्या वतीने वरिष्ठ विधीज्ञांनी सर्व्हे क्रमांक ५५५/१ हा भूसंपादन प्रक्रियेतून वगळण्यात आल्याचा आदेश तसेच माहिती अधिकारांतर्गत विविध शासकीय कार्यालयांकडून प्राप्त झालेली कागदपत्रे न्यायालयात सादर केली. त्यामध्ये संबंधित जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी कधीही भूसंपादित करण्यात आलेली नसल्याचे नमूद असल्याचा दावा करण्यात आला. न्यायालयाने सादर केलेले दस्तऐवज, पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरत आवश्यकता भासल्यास प्रथम कायदेशीर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. Relief for Arekars in land case in High Court

या प्रकरणात भारत सरकारतर्फे ॲड. माळी व ॲड. सिन यांनी बाजू मांडताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ हा सर्व्हे क्रमांक ५५५/१ मधून जात नसल्याने या जमिनीचा राष्ट्रीय महामार्गाशी संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. तर जमीनमालक महेंद्र आरेकर यांच्या वतीने वरिष्ठ विधीज्ञ एस. एस. गनबावले यांच्यासह ॲड. मनाली आरेकर, ॲड. पृथ्वीराज रावराणे, ॲड. सीमा कुंभार व ॲड. चिनार आरेकर यांनी कामकाज पाहिले. Relief for Arekars in land case in High Court

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRelief for Arekars in land case in High Courtटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.