• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 November 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सैन्य दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

by Mayuresh Patnakar
November 27, 2026
in Maharashtra
25 0
0
49
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पात्र उमेदवारांसाठी १० डिसेंबर रोजी निवड मुलाखतीचे आयोजन

गुहागर, ता. 27 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नवयुवक आणि नवयुवतींसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र (PCTC), नाशिक रोड, नाशिक येथे १४ ते २३ डिसेंबर दरम्यान मोफत ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) कोर्स क्र. ६८’ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे. Recruitment of Officers in the Armed Forces

प्रवेशासाठी आवश्यक पात्रता:

या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी एक पात्रता असणे आवश्यक आहे:

 * कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असावे.

 * एनसीसी (NCC) ‘सी’ प्रमाणपत्र ‘अ’ किंवा ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण असावे आणि एनसीसी ग्रुप मुख्यालयाने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

 * टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) किंवा विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी (UES) एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असावे किंवा शिफारस यादीत नाव असावे. Recruitment of Officers in the Armed Forces

मुलाखतीसाठी सोबत आणावयाची कागदपत्रे:

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW पोर्टलवर (Resources – PCTC Nashik- SSB 68) किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर उपलब्ध असलेले प्रवेशपत्र व परिशिष्टे डाऊनलोड करावीत. त्याची प्रिंट काढून ती पूर्णपणे भरून मुलाखतीवेळी सोबत आणावी. Recruitment of Officers in the Armed Forces

संपर्क माहिती:

या प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या प्रशिक्षण कार्यालयाशी (दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२, व्हॉट्सॲप क्र. ९१५६०७३३०६ किंवा ईमेल: training.pctcnashik@gmail.com) कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. Recruitment of Officers in the Armed Forces

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRecruitment of Officers in the Armed Forcesटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.