• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ज्ञानरश्मी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

by Manoj Bavdhankar
October 21, 2023
in Guhagar
82 1
2
Reading Inspiration Day at Gnanarashmi Library
162
SHARES
462
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ

गुहागर, ता. 21 : प्रचंड गरिबीतूनही वाचनाच्या आवडीतून अब्दुल कलाम एक थोर शास्त्रज्ञ व राष्ट्रपती बनले सर्वांनीच वाचत राहिल्यास जीवन जगण्याची सकारात्मक प्रेरणा मिळेल असे उद्गार ज्ञानरश्मी ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी काढले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ज्ञानरश्मी ग्रंथालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी ते बोलत होते. Reading Inspiration Day at Gnanarashmi Library

यावेळी आरेकर म्हणाले की, शासनाचे गाव तिथे ग्रंथालय ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही फक्त वाचन दिनानिमित्त वाचन न करता ही रोजची सवय लावून घेतली पाहिजे, असे आवाहन आरेकर यांनी केले. वंदना माने म्हणाल्या की, भारत महासत्ता बनेल याचे भाकीत अब्दुल कलाम यांनी केले व यासाठी त्यांनी कायम तरुणांना प्रोत्साहित केले. यावेळी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे दत्तात्रय गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ग्रंथालयाच्या सचिव प्राध्यापिका मनाली बावधनकर यांनी संपूर्ण सूत्रसंचालना बरोबरच विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेतून सहभाग घेताना कोणती तयारी करावी होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याचे मार्गदर्शन केले. Reading Inspiration Day at Gnanarashmi Library

या निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम कार्तिकी सुनील भोसले द्वितीय पूर्वी रुपेश बागकर तृतीय संस्कार समीर जांगळी व मोठ्या गटात प्रथम आर्या मंदार गोयथळे द्वितीय जीया कोलकांड तृतीय सान्वी संकेत गोयथळे यांनी यश मिळविले. त्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, प्रभुनाथ देवळेकर,  कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, सोनाली घाडे, आधी उपस्थित होते. Reading Inspiration Day at Gnanarashmi Library

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarReading Inspiration Day at Gnanarashmi Libraryटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.