• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा बँके निवडणुकीसाठी बाईत कुटुंब उमेदवार देणार

by Mayuresh Patnakar
October 20, 2021
in Old News
16 0
0
जिल्हा बँके निवडणुकीसाठी बाईत कुटुंब उमेदवार देणार
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये (RDCC Bank Election) चंद्रकांत बाईत, गुहागरचे शिवसेना (ShivSena) तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि त्यांच्या पत्नी सौ.  बाईत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  सदस्य अपात्र ठरविणे आणि गुहागर (Guhagar) तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 संचालकांना सहकार पॅनेलने नाकारल्याची ही प्रतिक्रिया मानली जात आहे.

गुहागरच्या सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन हालचालींना वेग आला आहे. रविवारी विकास संस्थामधील निवडक संचालक, पदाधिकारी, सभासद यांची पाटपन्हाळे येथे बैठक झाली. त्यावेळी गुहागर विकास संस्था मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. काहीजणांच्या नावांची चर्चा झाली. मात्र अनेकांनी चंद्रकांत बाईत यांच्याच नावाला पाठिंबा दिला. त्यामुळे गुहागर विकास संस्था मतदार संघातून चंद्रकात तथा आबा बाईत हे निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. आबांनी यापूर्वी विशेष मागास प्रवर्गातून सातत्याने निवडणुक लढविली होती. त्यांच्या या पारंपारीक मतदार संघातून शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच शेळी मेंढी आणि कुक्कुट पालन या मतदारसंघातूनही सचिन बाईत निवडणूक लढविणार आहेत. जिल्ह्यात या मतदारसंघात केवळ 25 मतदार आहेत. याशिवाय महिला राखिव मतदारसंघातून बाईत कुटुंब सचिन बाईत यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

एका बाजुला सहकार पॅनेल निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीत असताना गुहागर तालुक्यातून जिल्हा बँकेच्या चार मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची  प्रतिकिया उमटली आहे.

Tags: BankBreaking NewsElectionGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiRDCCगुहागरगुहागर न्यूजगुहागरमधील बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.