डॉ. ढेरे : वयोवृध्दांसाठी घरी येवून टेस्टची सुविधा, 24 तास सेवा
गुहागर, ता. 30 : गुहागरमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृत्यू होण्याच्या घटनांमुळे कोरोनावर लवकरात लवकर निदान होऊन तात्काळ उपचार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शनानुसार शहरातील ढेरे क्लिनिक येथे कोविड-१९ रॅपिड अॅन्टीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (Now in Guhagar City Rapid Antigen Test Facility is available in Dhere Clinc.)
जिल्ह्यासह गुहागर तालुक्यात कोरोनाचे संकट अधिक तीव्र होत चालले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आता केवळ सर्दी, ताप, खोकला एवढीच कोरोनाची लक्षणे नाहीत. दम लागणे, चक्कर येणे, सहन न करता येणारी डोकेदुखी अशी आणखी काही लक्षणांची भर त्यात पडली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपल्याला जरा जरी शंका आली तरी संबंधित व्यक्तीने अँटीजेन टेस्ट करणे हा कोरोना ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी ताबडतोब निकाल देणारी अँटीजेन टेस्ट केल्यास संशयीत कोरोनाग्रस्ताचे निदान होते.
आज गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात अँटीजेन टेस्ट करण्यासाठी जाणे सर्वांनाच मानसिकदृष्ट्या पटत नाही. मात्र अन्य कुठेही कोरोना तपासणी करण्याची व्यवस्थाच नव्हती. आज डॉ. निलेश ढेरे यांच्या ढेरे क्लिनिकमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एखाद्याला त्रास होत असेल तर ढेरे क्लिनिकमध्ये जावून आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी. If any Old Age Person / Any serious Patient of other disease in Home Dhere Clinic Health Worker giving Home Service for Corona Test.