• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समाजाची एकजूट असेल तर आरक्षण मिळेल

by Manoj Bavdhankar
August 24, 2021
in Old News
16 0
0
समाजाची एकजूट असेल तर आरक्षण मिळेल
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नारायण राणे, महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मंत्रिपद

चिपळूण, ता. 24 : माझ्या अध्यक्षतेखालील असलेल्या तत्कालीन समितीने समाजाला मराठा समाजाला आरक्षण दिले होते.  मात्र काही कारणाने ते टिकले नाही. आरक्षण मिळण्यासाठी समाजाने आपली ताकद दाखवायला  हवी.  समाजाची एकजूट असेल तर नक्कीच आरक्षण मिळेल.  असा विश्र्वास केंद्रीय मंत्री नारायण यांनी व्यक्त केला. ते चिपळूणमध्ये मराठा समाजातर्फे झालेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
(The committee under my chairmanship had given reservation to the Maratha community. But for some reason it didn’t last. The society has to show its strength to get reservation. If the society is united, there will be reservation. This belief was expressed by Union Minister Narayan Rane)


जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने चिपळूणमध्ये आलेल्या नारायण राणेंना केंद्रात महिनाभरापूर्वी मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्यावतीने तलवार देऊन नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कारला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, समाजाने माझा सत्कार केल्याबद्दल मी ऋणी आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वासाने कॅबिनेट मंत्री पद दिले.  कोकणातील जनतेला या पदाचा मोठा फायदा होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कोकणातील तरुणांना रोजगाराच्या विविध संधी मिळाव्यात, आर्थिकदृष्टा कोकणी माणुस सक्षम व्हावा. यासाठी मंत्रीपदाचा उपयोग करेन.
22 जुलैला आलेल्या महापुरामुळे चिपळूण शहर आणि परिसर उध्वस्त झाला.  पूरग्रस्तांना भेटून गेल्यानंतर केंद्र सरकारने तातडीची 700 कोटीची मदत राज्य सरकारला दिली. मात्र ही मदत अजूनही पूरग्रस्तांनापर्यंत पोचली नसावी. कारण आजही येथील गावांमधुन पुनर्वसन आणि मदती बाबतची निवेदने माझ्याकडे येत आहेत. दिल्लीत गेल्यानंतर सदर निवेदन संबंधित विभागांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करावा लागेल. हा पाठपुरावा करुन पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन.

Tags: Breaking NewschairmanshipfelicitatedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMaratha communityMarathi NewsNarayan RaneNews in GuhagarNews in MarathiReservationThe committeeUnion Ministerटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.