राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह खासदारांनी केले कौतुक
गुहागर, ता. 26 : जिल्ह्यातील मंडणगड आणि गुहागर या दोन तालुक्यातील पक्षाच्या अध्यक्षांनी अक्षरश: मेहनतीने संघटनात्मक बांधणी केली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी कौतूक केले. तर खासदार सुनील तटकरे म्हणाले की प्रतिकुल परिस्थितीतही सातत्याने सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून राजेंद्र आरेकर यांनी पक्ष बांधला आहे. जिल्हाध्यक्ष आणि खासदारांच्या कौतुकामुळे राजेंद्र आरेकर यांच्या कामाची पोचपावतीच मिळाली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार भास्कर जाधव यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. एखाद्या चक्रीवादळने होत्याचे नव्हते व्हावे अशी त्यावेळची परिस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्याची धुरा पुन्हा एकदा ज्येष्ठ कार्यकर्ते हुमणे गुरुजी यांच्या खांद्यावर ठेवली. युवा कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्ष बांधणीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. कोरोनाच्या काळतच एका धावत्या दौऱ्यात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र आरेकर यांची नाट्यमयरित्या तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राजेंद्र आरेकर हे एस. टी. महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले. आरेकरांनी निवृत्तीनंतर कृषी क्षेत्रात लक्ष घातले. कृषी पर्यटनाची जोड दिली. निसर्गाच्या सानिध्यात त्याच्यातला कवी जागा झाला. एक दोन कविता लिहिता लिहिता कवितासंग्रह प्रकाशित झाला. मग कोकण मराठी साहित्य परिषदचं काम सुरु झालं. त्यानंतर चिपळूणला झालेल्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने गुहागरात मराठी साहित्य परिषदेची शाखा सुरु झाली. त्याचे अध्यक्षपद राजेंद्र आरेकर यांनी घेतले. साहित्यातून सामाजिक कार्याकडे इथून वाटचाल सुरु झाली. गुहागरमध्ये विभागीय साहित्य संमेलनांचे नेतृत्त्व राजेंद्र आरेकर यांनी केले. ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष या नात्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ही पार्श्र्वभुमी असलेल्या राजेंद्र आरेकरांकडे गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद आले. तेव्हा तर पक्ष उदासीन होता. काहींनी मनातून राजेंद्र आरेकरांची चेष्टाच केली. काहीनी अविश्र्वासही दाखवला. राजकीय पार्श्र्वभुमी नसलेला तालुकाध्यक्ष पक्षाला निराशेच्या गर्तेतून बाहेर कसा काढणार हा प्रश्र्न होता. क्षेत्र राजकीय असल्याने रुसवे फुगवे, दुसऱ्याचे शक्तीस्थान हटविण्यासाठी कुरघोड्यांचे राजकारण हे होतेच.
अशा अविश्र्वासाच्या वातावरणातही राजेंद्र आरेकर यांनी युवा सहकाऱ्यांना सोबत घेवून संघटन मजबुत करण्यास सुरवात केली. वादात पडायचे नाही. वाद वाढवायचा नाही. दुसऱ्याला दुखवायचे नाही. कमीपणा घ्यायला लाजायचे नाही. असे काही नियम त्यांनी स्वत:साठी घालून घेतले. गावागावात जावून पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्र्वास दिला. ग्रामपंचायत निवडणुकीतही हेकेखोरपणा न करता शक्यतो निवडणुका बिनविरोध होतील यावर भर दिला. पक्षनेतृत्वाकडून आलेले कार्यक्रम उत्साहाने राबविले. चिपळूण पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबीर, अन्नदान, वृक्षारोपण, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, किनारे स्वच्छता मोहिम असे उपक्रम राबविले. यातून पक्षाचा जनसंपर्क कायम ठेवला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, अन्य पदाधिकारी, तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेवून जाण्यासाठी राजेंद्र आरेकर कायम आग्रही असायचे. याचाच परिणाम म्हणून गावागावातला कार्यकर्ता पुन्हा पक्षाला जोडला गेला.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा सभेला संपूर्ण सभागृह भरले होते. सर्व जातीचे, सर्व धर्मामधील कार्यकर्ते उत्साहात सभेला उपस्थित होते. पक्षाची ही संघटनात्मक स्थिती पाहिल्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि खासदारांनी उत्स्फुर्तपणे राजेंद्र आरेकर यांचे कौतूक केले.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी खालील हेडिंगवर क्लिक करा.
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी
हिवाळी अधिवेशनापर्यंत गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये
नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत सक्रिय व्हावे.
The NCP party presidents of Mandangad and Guhagar talukas of the district have literally worked hard to build the organization. In such words, District President of NCP Babaji Jadhav appreciated. On the other hand, MP Sunil Tatkare said that Rajendra Arekar has formed the party by consistently taking all the workers with him even in adverse circumstances. Rajendra Arekar’s work has been acknowledged due to the appreciation of the district president and MPs.