वेळणेश्वर महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात सत्कार
गुहागर, ता. 06 : महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वरच्या इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थी राज भोसले याची मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय कबड्डी संघात निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल महाविद्यालयात त्याचा गौरव करण्यात आला. Raj Bhosale selected in Kabaddi team
कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा दिनांक २७ ते २९ सप्टेंबर यादरम्यान स्पोर्ट्स अकॅडमी डेरवण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वरच्या १० खेळाडूंच्या मुलांच्या कबड्डी संघाने सहभाग घेतला. स्पर्धेनंतर आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय संघ निवड चाचणीत राज भोसलेने सहभाग घेतला. त्याच्या कामगिरीच्या आधारे त्याची कोकण विभागीय कबड्डी संघात निवड झाली. निवड झालेला कोकण विभागीय संघ आगामी आंतरविभागीय विद्यापीठ स्तरावरील कबड्डी स्पर्धेत सहभागी होणार आहे. Raj Bhosale selected in Kabaddi team
राज भोसलेच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यांनी त्याचा सत्कार करून अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे क्रीडा समन्वयक प्रा. औदुंबर पाटकर यांनी राज भोसलेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्याच्या मेहनतीचे आणि क्रीडा कौशल्याचे कौतुक केले. राजच्या या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. Raj Bhosale selected in Kabaddi team
