गुहागर, ता. 30 : रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी रात्री सलग ३ ते ४ तास कोसळलेल्या पावसाने भातशेती आणि नाचणी पिक भूईसपाट करुन टाकले आहे. गेल्या १५ दिवसांत पावसाने जितके नुकसान केले नाही त्यापेक्षा अधिक नुकसान बुधवारी रात्री झालेल्या पावसाने केले आहे. Rain damages rice crop

या कोसळलेल्या पावसाने भाताची लोंबी पावसाच्या फटकार्याने इतस्ता होवून दाणे विखुरले गेले आहेत. त्यामुळे यंदा भातकापणी नंतर भाताचे दाणे पुन्हा रुजून येणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांसमोर आता दुहेरी संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी भातकापणी नंतर काही दिवसांत ऑक्टोबर महिन्यांत कुलीथाचे पेरे होतात. नोव्हेंबर महिन्यांपर्यंत उकळ हाऊन उन्हाळी भाजीपाला ही केला जातो. मात्र यंदा परतीच्या पावसाने शेतकर्याचे वेळापत्रकचं कोलमडून टाकले आहे. बुधवारी रात्रीच्या पावसाने शेतकर्याला मोठा धक्का दिला आहे. संपूर्ण शेतात पाणी असून भातपीक सुकवण्याच्या जागाही पाण्याने भिजल्या आहेत. त्यामुळे भारे बांधूनच दूरपर्यंत न्ह्यावे लागत आहेत. याचाही ताण शेतकरी कुटुंबियांवर पडला आहे. एकादशीपर्यंत भातकापणी पूर्ण होते. पण यंदा तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. Rain damages rice crop
