• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 September 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शुंगारतळी सीएनजी पंपावरील वाहनांची रांग जानवळे फाटा पर्यंत

by Mayuresh Patnakar
September 28, 2026
in Guhagar
100 1
0
Queues of vehicles at CNG pump
197
SHARES
563
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अपघात घडल्यास याला जबाबदार कोण….? – विनोद जानवळकर

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी येथील सीएनजी पंपावर वाहनांची होणारी गर्दी आता जानवळे गावातील ग्रामस्थांना अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्याच्या एका बाजूला लागत असल्याने जानवळे गावात जाणाऱ्या व येणाऱ्यां वाहकधारकांना या ठिकाणी समोरून वाहने उभी असल्यामुळे राष्ट्रीय महार्गावरील येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला असून, वाहतुकीचा खोळंबाही होत आहे. या समस्येवर तातडीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी केली आहे. Queues of vehicles at CNG pump

गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता कोकणवासीय मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी परतू लागले आहेत. त्यामुळे शहर आणि परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम शृंगारतळी येथील सीएनजी पंपावरही दिसून येत असून, सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.  येथील सीएनजी पंपाच्या परिसरात रस्त्यावरून जानवळे गावातील वाहनधारक व ग्रामस्थ त्यांच्यामध्ये भीतीच वातावरण होतं आहे.  सीएनजीसाठी उभी असलेली वाहने रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या संख्येने जमा  झाल्यानंतर येणाऱ्या वाहन चालकाला अंदाज घेणे कठीण होते. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आणि दुकानांसमोर वाहन उभे असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. Queues of vehicles at CNG pump

या वाहनांच्या रांगांमुळे काही दिवसापूर्वी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनाचे नुकसान झाले होते. पंप व्यवस्थापक यांनी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे तसेच वाहतूक नियंत्रण यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विनोद जानवळकर यांनी केली असून जर अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी व्यक्त केला आहे. Queues of vehicles at CNG pump

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarQueues of vehicles at CNG pumpटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet49
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.