वैभव खेडेकर, कोरोना संकट हाताळण्यात सरकार अपयशी
गुहागर, ता. 14 : महाविकास आघाडी राज्यातील जनतेला पटलेली नाही. हे काहीतरी वेगळं समिकरण असल्याची जनतेची मानसिकता आहे. कोरोना महामारीची स्थिती हाताळ्यात या सरकारला अपयश आले आहे. असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला आहे.
The people of the state are not satisfied with the Mahavikas Aghadi. It is the mindset of the masses that this is a different equation. This government has failed to deal with the Corona epidemic. This allegation has been made by MNS state general secretary and Khed mayor Vaibhav Khedekar.
वैभव खेडेकर बुधवारी संघटनात्मक कामासाठी शृंगारतळीला आले होते. त्यावेळी वैभव खेडेकर यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.
महाविकास आघाडी अपयशी (Mahavikas Aghadi Failed)
कोरोनाच्या काळातील परिस्थिती हाताळताना सरकारला अपयश आले आहे. सरकारमधील कोणतेही मंत्री काम करत नाहीत. राज्यातील प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याची सरकारला माहिती नाही. वेगवेगळे निर्णय परस्पर घेतले जातात. नंतर बदलले जातात. या कारभारामुळे राज्यातील जनता, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, महिला हे सर्व घटक पिचलेले आहेत. याउलट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अनेकांचे प्रश्र्न कृष्णकुंजवर सोडवले आहेत. कोरोना महामारीत मनसैनिकांनी लोकांच्यात जावून अनेक कामे केली आहेत. आजही करत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्यात मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.
आमदार जाधव कोकणाचा कोहिनूर (MLA Bhaskar Jadhav is Konkan’s Kohinoor)
एखाद्या कार्यकर्त्यांला संधी मिळाली तर त्याचं सोनं कसं करायचं याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्करशेठ जाधव आहे. त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षाची आहे. अशा अनेक संघर्षांना यशस्वीपणे तोंड देत आमदार जाधव यांनी यश प्राप्त केले आहे. ते कोकणचा कोहिनूर आहेत. अल्पावधीसाठी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीच्या सरकारला एका वर्षांसाठी अभय मिळाले आहे. त्याची पोचपावती त्यांना मिळेल. महाविकास आघाडी त्यांच्याकडे निश्चितच मोठी जबाबदारी देईल असे मला वाटते.
माजी आमदार संजय कदम यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बळ द्यायला हवे. महाविकास आघाडीच्या सत्तेत त्यांनाही एखादे महामंडळ किंवा तोलामोलाचे पद दिले तर खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघाबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याला त्याचा फायदा होईल.
महामार्गाच्या कामाबाबत आवाज उठवणार
पालशेत बाजारपुलाबाबत कोणीही राजकारण करु नये. सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी करुन हा पुल लवकरात लवकर वहातुकीसाठी खुला करावा. विजापुर महामार्गाच्या कामाबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत. आजपर्यंत अनेक निवेदने आम्ही दिली आहेत. आता थेट मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुन काम योग्य प्रकारे होण्यासाठी कशी भुमिका घ्यायची याची दिशा ठरवली जाईल.
विनोद जानवळकर यांचा तालुक्यात चांगला संपर्क आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली येथे पक्ष वाढतोय. मनसेचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पक्ष वाढीसाठी आवश्यक ते बळ देण्याचे काम आम्ही करत आहोत.
यावेळी मनसेच्या कामगार शाखेचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदिप फडकले, तालुकाप्रमुख विनोद जानवळकर, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.