• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 November 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरची आमसभा पाणी, वीज समस्यांवर गाजली

by Mayuresh Patnakar
November 4, 2026
in Guhagar
19 0
0
Public Meeting at Guhagar
37
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आ. जाधव यांनी घेतला विकासकामांचा आढावा

गुहागर, ता. 04 : तालुक्याची आमसभा मंगळवारी आ. भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत प्रामुख्याने पाणी योजना व विजेसंदर्भात महावितरणविरोधात असलेल्या तक्रारींचा पाढा नागरिकांनी वाचला. यावेळी गुहागर तालुका अद्यापही दुष्काळी जाहीर झाला नसल्याबद्दल असंख्य नागरिकांनी नाराजी व्यक्त करत याचा आमदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. सुरुवातीला वर्षभरात दिवगंत झालेल्या सर्व स्तरातील ज्ञात, अज्ञातांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर खामशेत ग्रामपंचायत, नासासाठी निवड झालेले शाळांचे विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. Public Meeting at Guhagar

तालुक्यातील काताळे, पेवे या गावांतील पाणी योजनांचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या या योजना तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचना आ. जाधव यांनी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. जलजीवन योजनेचा निधी केंद्र सरकारने दिलेला नसल्याने या योजनांच्या तक्रारी वाढत असून यामुळेच त्यांचा बोजवारा उडाल्याची वस्तुस्थिती आ. जाधव यांनी सांगितली. कोतळूक शिगवणवाडी येथील बांधलेला बंधारा एक वर्षातच ढासळला असून अद्यापही ठेकेदाराने तो दुरुस्त केलेला नसून तो दुरुस्त करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी वीज ग्राहकांनी महावितरण अधिकाऱ्यांविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. स्मार्ट मीटर बळजबरीने व पोलिस बंदोबस्तात बसविले जात असून बंद घरांमध्येही मीटर बसविण्याचे कारस्थान अधिकारी करत आहेत. शृंगारतळी महावितरणचे सोनावणे ग्राहकांना उध्दटपणे उत्तरे देतात, शंकांचे निरसन करत नाहीत. त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. Public Meeting at Guhagar

आमसभेला गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किंवा अन्य प्रतिनिधी आलेला नसल्याने गुहागर शहरातील मांडलेल्या समस्यांवर विस्तृत चर्चा झाली नाही. परिणामी, मुख्याधिकारी हे मनमानी कारभार करत असून ते कधीही चर्चेलाही बसत नसल्याचे आ. जाधव यांनी स्पष्ट केले. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव मांडून तो राज्याच्या नगरविकास प्रशासनाकडे पाठविण्यात येईल, असा ठराव मांडण्यात आला. गुहागर एसटी आगाराच्या बस ग्रामीण भागात वेळेवर जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करुन यामुळे शाळेच्या मुलांचे हाल होत असल्याचे सचिन बाईत यांनी निदर्शनास आणून दिले.

उमेश खैर यांनी तालुक्यात ब्लडबँक किंवा एखादे स्टोअरेज असावे असा मुद्दा मांडला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित रस्त्यांच्या दुतर्फा झाडी तोडण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. तालुक्यातील पिंपर शाळेवर आणखी एका शिक्षकाची मागणी करण्यात आली. यावर मराठी शाळांमध्ये मुले असूनही शिक्षक नाहीत अशा शाळांवर बंद पडलेल्या शाळांचे शिक्षक द्यावेत असे गटशिक्षणाधिकारी यांना आ. जाधव यांनी आदेश दिले. तसेच गुहागर तालुक्यात पगार घेऊन सातारा येथे बदली करण्यात आलेल्या शिक्षकाला पुन्हा येथे बोलवावे किंवा त्याची थेट बदली करावी, असे सूचित केले. यावेळी ई पीक पाहणीबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकेचे तहसिलदार परिक्षित पाटील यांनी निरसन केले. या आमसभेला सभापती प्रणव पोळेकर, सर्व सदस्य, चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिगाडे, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, जिल्हापरिषद सदस्य विक्रांत जाधव, महेश नाटेकर, प्रमोद गांधी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. Public Meeting at Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPublic Meeting at Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.