• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर

by Mayuresh Patnakar
August 22, 2026
in Maharashtra
32 1
0
Public Ganeshotsav Competition
63
SHARES
181
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

रत्नागिरी, ता. 22 : राज्य शासनाच्यावतीने यंदा राज्यस्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. Public Ganeshotsav Competition

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली किंवा स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रीतसर परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत पात्र असतील. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshostav.pidmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मूल्यमापनाचे निकष व गुणांकन (एकूण १०० गुण) मंडळांची निवड ५ प्रमुख निकषांवर केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येकी २० गुणांचा समावेश आहे.  Public Ganeshotsav Competition

 * कलांचे जतन व संवर्धन (२० गुण)
 * संस्कृतीचे जतन व संवर्धन (२० गुण)
 * निसर्ग आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण व संवर्धन (२० गुण)
 * सामाजिक कार्य (२० गुण)
 * गणेशोत्सव आयोजनातील विधायकता व शिस्त (२० गुण)

जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली गठीत तालुकास्तरीय समित्या प्रत्यक्ष गणेशोत्सवादरम्यान मंडळांना भेटी देतील. मूल्यमापनासाठी मंडळांच्या सन २०२५ च्या अनंत चतुर्दशीपासून ते सन २०२६ च्या अनंत चतुर्दशीपर्यंतच्या वर्षभरातील कार्याचा विचार केला जाईल. भेटीदरम्यान मंडळांनी कामाचे फोटो, अहवाल व व्हिडिओग्राफी सादर करणे अनिवार्य आहे. तालुकास्तर: प्रथम क्रमांकाच्या एका मंडळास ₹२५,००० रोख व प्रमाणपत्र. जिल्हास्तर: प्रथम क्रमांक: ₹५०,०००, द्वितीय क्रमांक: ₹४०,०००,  तृतीय क्रमांक: ₹३०,०००. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या विधायक उपक्रमांची नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. Public Ganeshotsav Competition

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPublic Ganeshotsav Competitionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share25SendTweet16
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.