• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आज लाचलुचपत प्रतिबंधाबाबत शृंगारतळीत जनजागृती

by Mayuresh Patnakar
October 29, 2026
in Guhagar
34 1
0
Public awareness on corruption prevention
68
SHARES
193
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

DYSP अविनाश पाटील यांचा नागरिकांशी संवाद

गुहागर, ता. 29 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau, Ratnagiri) रत्नागिरी विभागाच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज,  २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शृंगारतळी येथे चर्चासत्र व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पाटपन्हाळे, शृंगारतळी येथे सायंकाळी ४.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau) चे उपअधीक्षक अविनाश पाटील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. Public awareness on corruption prevention

लाच मागितल्यास नागरिकांनी काय करावे, तक्रार कुठे व कशी दाखल करावी आणि तक्रारदाराची ओळख गोपनीय कशी ठेवली जाते, याबाबत या चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून लाच मागण्याच्या घटनांविरोधात पुढे यावे, या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुहागर तालुक्यातील नागरिकांनी या चर्चासत्राला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau, Ratnagiri) यांच्याकडून करण्यात आले आहे.  Public awareness on corruption prevention

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPublic awareness on corruption preventionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share27SendTweet17
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.