• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिखली बीट क्र.२ चा राष्ट्रीय पोषण कार्यक्रम संपन्न

by Ganesh Dhanawade
September 25, 2022
in Guhagar
17 1
0
Program of Chikhli Beat No. 2 completed
34
SHARES
98
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विविध प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, विविध नृत्य प्रकारांचा समावेश

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना, गुहागरच्या चिखली बीट क्र.२ च्या वतीने “राष्ट्रीय पोषण महिना” विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.  शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छञपती शिवाजी महाराज सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला.  या विविध खाद्यपदार्थ प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पालेभाज्या व कडधान्ये प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, विविध नृत्य प्रकार सादर करून जनजागृती केली. Program of Chikhli Beat No. 2 completed

या कार्यक्रमात चिखली बीट अंतर्गत २६ अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहभाग घेतला होता. महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येतो. त्याद्वारे समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून प्रयत्न केले जातात. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो. राष्ट्रीय पोषण महिना अभियानाची जनजागृती होण्यासाठी चिखली बीट नं. २ मधील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना गुहागरचे प्रकल्पाधिकारी केळस्कर, पर्यवेक्षिका चैताली हळये यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा महिला राष्ट्रीय पोषण महिना अभियान अंगणवाड्यांवर उत्कृष्ठपणे राबवित आहेत. या अभियानामधुन मुलांना पुरक पोषण आहार देण्याबरोबरच पालकांमध्येही या आहाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गर्भवती माता, माता यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, लहान मुलांना कुपोषणमुक्त, सुदृढ बनविण्यासाठी रोजच्या आहारात फळे आणि पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे. हा विचार सर्वांपर्यंत पोचवा म्हणून विविध ठिकाणी कार्यक्रम राबविला जात आहे. सदरचे अभियान अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकापर्यंत पोहचत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. Program of Chikhli Beat No. 2 completed

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पर्यवेक्षिका चैताली हळये यांनी राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्याबाबत उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ. शशिकला वाडकर यांनी महिलांच्या आरोग्य विषयक समस्या त्याचे उपाय, माता बालक यांचे सशक्तीकरण होण्यासाठी पोष्टिक पदार्थ आपल्या शरीराला किती फायदेशीर असते याची माहिती दिली. सरपंच संजय पवार यांनी अंगणवाडी सेविकांनी राष्ट्रीय पोषण अभियाना मध्ये घेतलेला उत्फुर्त सहभाग तसेच पोषण आहारा संदर्भात बनविलेले पदार्थ, पोषण आहारासाठी लागणारे घटकांची मांडणी पाहून कौतुक केले.  Program of Chikhli Beat No. 2 completed

या कार्यक्रमासाठी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकला वाडकर, पर्यवेक्षिका चैताली हळये, दिनेश चव्हाण, उमेश शिंदे, गणेश किर्वे, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका श्वेता शिंदे यांनी केले. Program of Chikhli Beat No. 2 completed

Tags: Guhagarguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarNews in GuhagarProgram of Chikhli Beat No. 2 completedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.