श्री स्वामी समर्थ शौर्य इलेव्हन संघ विजेता तर ओम साई क्रिकेट संघ उपविजेता
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पिंपर येथे दिनांक १० रोजी पिंपर प्रीमियर लीग २०२६ पर्व सहावे उत्साहात पार पडले. या स्पर्धेत संघ मालक कु. योगेश मोरे यांच्या श्री स्वामी समर्थ शौर्य इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक ओम साई क्रिकेट संघ (संघ मालक कु. विधान पवार) यांनी पटकावला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. Premier League concludes at Pimper
संघाचे कर्णधार हर्ष दवंडे यांच्या नेतृत्वाखाली उपकर्णधार मंगेश दवंडे आणि आयकॉन खेळाडू शुभम काजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शौर्य इलेव्हनने संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ सादर केला. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये शौर्य इलेव्हनचे वर्चस्व ठळकपणे दिसून आले. उत्कृष्ट फलंदाज हर्ष दवंडे, उत्कृष्ट गोलंदाज अंकुश दवंडे, मालिकावीर सुदेश दवंडे या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. Premier League concludes at Pimper
या स्पर्धेत मोरेश्वर इलेव्हन (शैलेश मोरे), पार्थ इलेव्हन (सुरेश पिंपरकर), अव्यान मोरे इलेव्हन (सुशिल मोरे), जय बजरंग इलेव्हन फायटर (दत्तात्रय रहाटे), सिद्धीविनायक स्पोर्ट्स (अतुल साळवी), ओम साई क्रिकेट संघ (विधान पवार), रणझुंजार क्रिकेट संघ (नरेश काजारे) आणि श्री स्वामी समर्थ शौर्य इलेव्हन यांचा समावेश होता. Premier League concludes at Pimper
विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, शिवसेना उबाठा नेत्या सिध्दी रामगडे, गोल्डन मॅन वैभव रहाटे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुशिल मोरे, तसेच प्रकाश साळवी यांसारखे मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला पिंपर गावातील क्रिकेटप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आणि स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे मोठ्या उत्साहात पार पडली. Premier League concludes at Pimper
