• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परिवहन मंत्री सरनाईक यांची सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट

by Manoj Bavdhankar
June 2, 2026
in Ratnagiri
92 1
0
Pratap Sarnaik visits Sahyadri Education Institute
181
SHARES
517
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संस्थेच्या कार्याचा घेतला आढावा

गुहागर, ता. 02 : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी चिपळूण येथील महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट देऊन संस्थेच्या विविध उपक्रमांची आणि प्रगतीची माहिती घेतली. यावेळी आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. Pratap Sarnaik visits Sahyadri Education Institute

भेटीची सुरुवात स्वर्गीय गोविंदराव निकम स्मृतीस्थळाला भेट देऊन झाली. यावेळी सरनाईक यांनी गोविंदराव निकम यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच परिसरातील शंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर त्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट देत संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि विकासात्मक कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत चर्चा केली. Pratap Sarnaik visits Sahyadri Education Institute

यावेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, राकेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सह्याद्री शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत संस्थेच्या प्रगतीबद्दल प्रताप सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. Pratap Sarnaik visits Sahyadri Education Institute

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPratap Sarnaik visits Sahyadri Education Instituteटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.