गुहागर ता. 6 : तालुक्यातील मोडकाआगर परिसरात दुपारी 3 ते 4 वेळात दोन वेळा वीज कोसळली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र महेंद्र आरेकर यांच्या शेतघरातील वीज मीटर व वीज वाहिन्या जळून खाक झाल्या. यामध्ये आरेकर यांचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महावितरणचे वायरमन यादव यांनी वीज पडल्याचे समजताच तत्काळ घटनास्थळांना भेट देवून अन्य अपघात होणार नाहीत अशी व्यवस्था केली. याच पावसाळ्यात जुलै महिन्यात असगोलीतील घरावर वीज कोसळून घरातील संपूर्ण वायरिंग जळून गेले होते. There were two power outages in Modkaagar area of Guhagar taluka between 3PM to 4PM. Fortunately no one was injured. However, the electricity meter and power lines in Mahendra Arekar’s farm were burnt.


घटस्थापनेच्या दिवशी 7 आँक्टोबरला दुपारी गुहागर मध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. दुपारी 3.30 च्या सुमारास गुहागर, पालशेत परिसरात मोठ्याने वीज कडाडल्याचा आवाज झाला. तेव्हाच या परिसरात वीज कोसळल्याचे लक्षात आले. ही वीज मोडकाआगर धरणाजळील श्रीपुजा फार्महाऊस (शेतघर) येथे पडली. बाहेरच्या बाजुला असलेल्या वीज मिटरमध्ये वीज खेचली गेली. त्यामुळे दोन्ही मिटर जळले. तसेच शेतघरातील वायरिंगही क्षणार्धात जळले. खोलीतील स्वीच बोर्ड फुटला.
अवघ्या अर्ध्या तासात आसमंत दणाणून सोडणारा पुन्हा आवाज झाला. यावेळी मात्र वीज मोडकाआगर आणि गुहागर यांच्या मधील जंगलात पडली. वीजेच्या तारांनी वीज खेचल्यावर मोडकाआगर येथील पेठे ब्रेक कंपनीच्या आवारातील ट्रान्सफार्मरवरील तिन्ही डिओ जळले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
वीज कोसळल्याची माहिती कळल्यावर तातडीने या परिसरातील वायरमन यादव यांनी श्रीपूजा शेतघराला भेट दिली. तेथील मिटरची पहाणी केली. वीजेच्या खांबांवरुन वीज मिटर मध्ये आलेल्या वायर काढू टाकल्या. वीजफळीवरील सर्व फ्यूज काढून टाकले. त्यानंतर पेठे ब्रेक मोटर्स येथील ट्रान्सफार्मरची पहाणी केली.
पुढील दोन तास वीजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊसही झाला. एकूणच वातावरण भयगंभीर झाले होते. आजच शृंगारतळी येथील विनायक ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपात सीएनजी गॅस स्टेशनचे उद्घाटन झाले. संध्याकाळी वीजा कडकडल्याच्या घटना घडल्यानंतर गॅस स्टेशन दोन तास बंद ठेवण्यात आले होते.