• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत मारुती मंदिर ते बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजविले

by Mayuresh Patnakar
August 24, 2026
in Guhagar
175 2
2
Potholes on the road were filled
344
SHARES
982
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : पालशेत येथील मारुती मंदिर ते बाजारपेठ या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. Potholes on the road were filled

पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर हे जातीने घटनास्थळी उपस्थित राहून या कामाची पाहणी करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती मंदिर ते बाजारपेठ या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांकडे लक्ष देत नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. Potholes on the road were filled

पालशेत येथील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न समोर आल्यानंतर त्यांनी केवळ पाठपुरावा न करता प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. Potholes on the road were filled

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPotholes on the road were filledटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share138SendTweet86
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.