जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरीयांच्यातर्फे आयोजन
गुहागर, ता. 26 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे तालुक्यातील तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय याचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. हे प्रशिक्षण केंद्र गुहागर देवपाठ बाजारपेठ, दापोली अर्बन बँक च्या शेजारी, सुरु करण्यात आले आहे. सदर कार्यालयाचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्रचे संस्थापक व शिवसेना – उपनेते निलेश भगवान सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. Police Pre-Recruit Training Center at Guhagar

यावेळी प. पू. सदगुरू श्री आलोकनाथजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र भोगवती नगर, तानसा),अँड. प्रसाद जांगळे यांच्यासह जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपनेते निलेश भगवान सांबरे यांनी प्रशिक्षण केंद्र कार्यालयाची पाहणी केली. यावेळी अँड. प्रसाद जांगळे यांच्या हस्ते मार्गदर्शन पुस्तिका देऊन निलेश सांबरे यांचा सत्कार करण्यात आला. Police Pre-Recruit Training Center at Guhagar
या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये एमपीएससी, एसएससी एमटीएस जीडी, पोलीस अग्निशमक दल भरती, शासनाच्या विभागीय भरती, बँकिंग आर आर बी., पी एस.यु. या अनेक स्पर्धा परीक्षांसाठी तज्ञ मार्गदर्शन कडून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. Police Pre-Recruit Training Center at Guhagar

कुठल्याही जाती धर्माच्या, पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या, आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी २००८ पासून निलेश भगवान सांबरे यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांचे हे काम संपूर्ण कोकणात करत आहेत. त्यांनी चालु केलेले उपक्रम, विविध, सुविधा,आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, महिला सक्षमीकरण अश्या अनेक सुविधा आहेत. त्यांनी चालु केलेल्या उपक्रमांची व सुविधाची माहिती यावेळी देण्यात आली. Police Pre-Recruit Training Center at Guhagar