• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वालावलकर रुग्णालयात मोफत बाल शस्त्रक्रिया शिबिर

by Mayuresh Patnakar
July 17, 2026
in Ratnagiri
20 0
0
Pediatric surgery camp at Walawalkar Hospital
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 17 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सावर्डे येथील बीकेएल वालावलकर रुग्णालयात २१ व २२ जुलै २०२६ रोजी गरजू बालकांसाठी मोफत बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (रत्नागिरी), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि बीकेएल वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. Pediatric surgery camp at Walawalkar Hospital

Pediatric surgery camp at Walawalkar Hospital

या शिबिरात मुंबईतील प्रख्यात बालशल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांवरील विविध शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये पोटाचे आजार, जन्मजात व्याधी, नवजात बालकांवरील शस्त्रक्रिया, लघवीच्या तक्रारी, शरीरावरील गाठी व सूज, तसेच अपेंडिक्स आणि हर्निया यांसारख्या आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे. Pediatric surgery camp at Walawalkar Hospital

शिबिराचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड तसेच आधार कार्ड किंवा ओळख व पत्त्याचा पुरावा आवश्यक असून, इच्छुक पालकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सुमित सावंत यांनी केले आहे. संपर्क: ८८४७७९०१४९, ९२७२८९७८३४, ९९२२५६६६३९. Pediatric surgery camp at Walawalkar Hospital

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPediatric surgery camp at Walawalkar Hospitalटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.